“...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:51 AM2021-07-31T10:51:33+5:302021-07-31T10:58:53+5:30

assam mizoram border conflict: आसाम-मिझोराम सीमावादावरून संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून अमित शहांना सल्ला दिला आहे.

sanjay raut gave advice to amit shah on assam mizoram border conflict | “...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला

“...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला

Next
ठळक मुद्देवरवर शांतता दिसत असली तरी खदखद कायम दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्याआसाम-मिझोराम सीमावादावरून संजय राऊत यांचा अमित शहांना सल्ला

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे. कारण आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सल्ला दिला असून, अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ असल्याचे म्हटले आहे. (sanjay raut gave advice to amit shah on assam mizoram border conflict)

तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR

भारतातील काही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणावाचे विषय केंद्राशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. आसाम व मिझोराम ही ईशान्येकडील दोन राज्ये भारतावर नकाशावर आहेत, पण दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले. राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंड भारत या संकल्पनांना तडा देणारे हे प्रकरण आहे, असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे. 

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

वरवर शांतता दिसत असली तरी खदखद कायम 

आसाम आणि मिझोराममधील जमिनीचा वाद आज वरवर शांत दिसत असला तरी खदखद कायम आहे. ही दोन्ही राज्ये संवेदनशील व देशाच्या सीमेवर आहेत. ईशान्येकडील राज्ये अशांत राहणे म्हणजे बाह्य शत्रूंना वाव देण्यासारखे आहे. हा विवाद ब्रिटिश काळापासून आहे व स्वतंत्र भारतातही हा विवाद संपवता आला नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्या

एका बाजूला आपण म्हणायचे की, कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान एक आहे, विविधतेत एकता आहे, पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? भारतीय संस्कृतीवर चर्चा आपण करतो तेव्हा काय सांगतो? येथे केवळ दुःखं वाटून घेतली जातात. त्याच वेळी आपण जात, धर्म आणि राज्यांच्या सीमांवरून खुनी खेळ करीत आहोत. आसाम आणि मिझोरामच्या जमिनीच्या भांडणात रक्तपात झाला आहे. दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्या. यास देशांतर्गत युद्धच म्हणावे लागेल. याचा फायदा बाजूचे शत्रू राष्ट्र उठवल्याशिवाय कसे राहतील? मिझोराम, मणीपुरात चिनी माओवाद्यांचे गट कार्यरत आहेत. त्यांना अशाने बळ मिळेल, असेही यात म्हटले आहे. 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sanjay raut gave advice to amit shah on assam mizoram border conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app