तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 09:42 AM2021-07-31T09:42:13+5:302021-07-31T09:43:37+5:30

आसाम आणि मिझोरम दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे.

fir registered against assam cm himanta biswa sarma in mizoram over border clash | तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR

तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR

Next

गुवाहाटी: गेल्या अनेक दिवसांपासून आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे. कारण आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याआधी दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांविरोधात समन्स बजावल्याचे समजते. (fir registered against assam cm himanta biswa sarma in mizoram over border clash)

२६ जुलै रोजी आसाम आणि मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांचे पोलीस आणि सुरक्षादल एकमेकांसमोर येऊन झालेल्या गोळीबार आणि झटापटीत काही पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली. यावरून मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात FIR दाखल केला असून, झटापट, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची सांगितले जात आहे. याशिवाय २०० अज्ञात पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

राहुल गांधींचे टीकास्त्र

इशान्येकडील आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सीमावादावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. याचबरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृहमंत्र्यांचे अपयश समोर आले आहे. देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

दरम्यान, आसाम-मिझोरामच्या सीमेवर आपल्या सीमेचे रक्षण करत असताना आसाम पोलीस दलाचे ६ शूर पोलीस शहीद झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दु:ख होतंय. माझ्या सहवेदना त्यांच्या संतप्त कुटुंबियांच्या सोबत आहेत, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विटमध्ये म्हटले. आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरलेय.
 

Web Title: fir registered against assam cm himanta biswa sarma in mizoram over border clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.