नाशिक निवडणूक निकाल: देवळाली मतदार संघात शिवसेनेच्या घोलपांना धक्का, राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:34 AM2019-10-24T10:34:09+5:302019-10-24T10:41:50+5:30

nashik vidhansabha election results 2019 नाशिक- नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा सर्वाधिक मोठा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देवळाली मतदार संघात या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात त्यांचे आमदार पुत्र डॉ. योगेश घोलप दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या नवख्या सरोज आहिरे या आघाडीवर आहेत.

Shiv Sena slogans in Deolali constituency, Saroj Ahir leading in Rashtrapati, Vidhansabha election results2019 | नाशिक निवडणूक निकाल: देवळाली मतदार संघात शिवसेनेच्या घोलपांना धक्का, राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर

नाशिक निवडणूक निकाल: देवळाली मतदार संघात शिवसेनेच्या घोलपांना धक्का, राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्देयोगेश घोलप हे माजी मंत्र्याचे पुत्रनवख्या आहिरे यांचा दणका

नाशिक-नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा सर्वाधिक मोठा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या देवळाली मतदार संघात या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात त्यांचे आमदार पुत्र डॉ. योगेश घोलप दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या नवख्या सरोज आहिरे या आघाडीवर आहेत.

गेले तीस वर्षे या मतदार संघात घोलप कुटूंबियाची सत्ता आहे. बबनराव घोलप हे सतत आमदार असताना युती सरकारच्या राजवटीत समाजकल्याण मंत्री होते. न्यायालयाने त्याांना गैरव्यहारात दोषी ठरवल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे पुत्र योगेश घोलप हे आमदार आहेत.
विधान सभा निवडणूकीच्या मतमोजणीत आत्तापर्यंत तीन फे-या झाल्या असून त्यातराष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांना ५७१७ मते मिळाली तर घोलप यांना २८७१ मते मिळाली आहेत.

Web Title: Shiv Sena slogans in Deolali constituency, Saroj Ahir leading in Rashtrapati, Vidhansabha election results2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.