Kamthi Election Results : बावनकुळेंच्या पुण्याईने सावरकर यांना तारले : काँग्रेसने भरविली होती धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:20 AM2019-10-25T00:20:22+5:302019-10-25T00:20:59+5:30

Kamthi Election Results 2019 : Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar , Maharashtra Assembly Election 2019

 Kamthi Election Results: Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar | Kamthi Election Results : बावनकुळेंच्या पुण्याईने सावरकर यांना तारले : काँग्रेसने भरविली होती धडकी

Kamthi Election Results : बावनकुळेंच्या पुण्याईने सावरकर यांना तारले : काँग्रेसने भरविली होती धडकी

googlenewsNext
ठळक मुद्देभोयर यांना शहरात फटका

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (कामठी) : राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकास कामांच्या पुण्याईने भाजपचे टेकचंद सावरकर यांना कामठीत शेवटच्या क्षणी तारले. जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली असता मतदानाच्या अखेरच्या दिवशी बावनकुळे यांनी माझ्यासाठी सावरकर यांना विजयी करा, अशी मतदारांना हाक दिली. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेरीत काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी भाजपला धक्का दिला. त्यामुळे सावरकरही हरतील असे वाटत होते. मात्र मतदार संघातील शहरी मतदारांनी भाजपला साथ दिल्याने सावरकर ११ हजार ११६ मतांनी विजयी झाले. सावरकर यांना तब्बल १,१८,१८२ तर भोयर यांना १,०७,०६६ मते मिळाली. कामठीत ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) शकीबूर रहमान अतिकूर रहमान यांनी घेतलेली ८,३४५ मते भोयर यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. वंचित बहुजन आघाडीचे राजेश काकडे यांनी १०,६०१ मते घेत काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडले. बसपाचे प्रफुल मानके यांना ७,६१२ मते मिळाली, तर प्रहारचे मंगेश देशमुख ११३८ मतावर थांबले.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सावरकर यांनी ४१० मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत सावरकर यांनी ४,५२६ मते घेत काँग्रेसचे भोयर यांना ९६३ मतांनी मागे टाकले. यानंतर कामठी शहरातील बूथच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी ४,३४८ मते घेत सावरकर यांना ७९० मतांनी मागे टाकले. कामठी शहरात (एमआयएम) आणि वंचित बहुजन आघाडीने मुसंडी मारल्याने भोयर यांना येथे अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाही. यानंतरच्या फेरीत भोयर आणि सावरकर यांच्यात काट्याची टक्कर झाली. मात्र शेवटच्या काही फेरीत भोयर यांना कमी मते मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title:  Kamthi Election Results: Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.