सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:46 IST2019-03-25T18:45:01+5:302019-03-25T18:46:05+5:30
सध्या वैदेही फिटनेस फ्रिक झाली आहे. इतकेच नाही तर तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. सध्या वैदेही फिटनेस फ्रिक झाली आहे. इतकेच नाही तर तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वैदेही परशुरामने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती क्रंच पंच एक्सरसाईज व प्लँक्स करताना दिसते आहे. या व्हिडिओसोबत तिने म्हटले की, 'दुसऱ्यापेक्षा चांगले दिसणे म्हणजे फिटनेस नव्हे. तुम्ही आहात त्यापेक्षा फिट राहण्यासाठी फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. '
मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.
आता वैदेही कोणत्या सिनेमात झळकणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.