Video: 'रितेश देशमुखने माझी स्टोरी चोरली'; भाऊ कदमने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:30 IST2023-03-26T14:30:00+5:302023-03-26T14:30:00+5:30

Bhau kadam: 'वेड' सिनेमाविषयी भाऊ कदमने केला मजेशीर व्हिडीओ

Riteish Deshmukh stole my story bhau kadam funny video viral on social media | Video: 'रितेश देशमुखने माझी स्टोरी चोरली'; भाऊ कदमने केला आरोप

Video: 'रितेश देशमुखने माझी स्टोरी चोरली'; भाऊ कदमने केला आरोप

महाराष्ट्राचा लाडका लेक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा 'वेड' (ved) हा मराठी चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री आणि रितेशची पत्नी जेनेलिया डिसुझा ( Genelia D'Souza) हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाणी तुफान गाजली. मात्र, आता विनोदवीर आणि अभिनेता भाऊ कदम (bhau kadam) याने रितेशवर स्टोरी चोरल्याचा आरोप केला आहे. भाऊ कदमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav 2023) सोहळ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ कदमने वेड चित्रपटातील सत्याचा लूक केला आहे. या लूक विषयी बोलत असताना रितेश देशमुखने माझी स्टाइल आणि लूक चोरल्याचा आरोप केला. यात वेड लावलंय ही हूक स्टेप नसून मी अंघोळ झाल्यानंतर त्या पद्धतीने डोकं पुसतो हेच पाहून रितेशने ती स्टेप केल्याचं भाऊचं म्हणणं आहे.

दरम्यान, भाऊ कदमने केलेला हा आरोप मजेचा भाग आहे. त्याच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे आणि निलेश साबळे यांनीही या विनोदात सहभाग घेतला. विशेष म्हणजे त्याच्या या विनोदावर रितेश आणि जेनेलिया हेदेखील खळखळून हसले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे,
 

Web Title: Riteish Deshmukh stole my story bhau kadam funny video viral on social media