निर्माते अमोल कांगणे सांगतायेत खूप अडचणींवर मात करत हलाल चित्रपटाची निर्मिती केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 06:00 AM2017-10-04T06:00:25+5:302017-10-04T11:30:25+5:30

अलीकडच्या काळात तरुणाईची पावलंही चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळत आहेत. मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्याचा वसा जपत तरुण मंडळी चित्रपट निर्मिती करत ...

Producer Amol Kangane produced the film Halal by overcoming many obstacles in the story | निर्माते अमोल कांगणे सांगतायेत खूप अडचणींवर मात करत हलाल चित्रपटाची निर्मिती केली

निर्माते अमोल कांगणे सांगतायेत खूप अडचणींवर मात करत हलाल चित्रपटाची निर्मिती केली

googlenewsNext
ीकडच्या काळात तरुणाईची पावलंही चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे वळत आहेत. मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्याचा वसा जपत तरुण मंडळी चित्रपट निर्मिती करत आहेत. ‘हलाल’ या आगामी चित्रपटानेही मराठी चित्रपटसृष्टीला एक तरुण निर्माता दिला आहे. ‘हलाल’ची निर्मिती करणाऱ्या अमोल कागणे यांनी पदार्पणातच एक धाडसी विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे यांच्यासोबत अमोल कागणे फिल्म्स या बॅनरखाली अमोलने ‘हलाल’ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट लेखक राजन खान यांच्या कथेवर आधारित असून याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. येत्या शुक्रवारी ६ ऑक्टोबरला हलाल प्रदर्शित होणार आहे.
यापूर्वी चित्रपट निर्मितीच्या इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अमोल यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. पहिलीच निर्मिती करताना एका ज्वलंत आणि गंभीर मुद्द्यावर चित्रपट बनविण्याबाबत अमोल सांगतात की, या अगोदर मी नाटकांची निर्मिती केली असून अभिनयही केला आहे. याखेरीज चित्रपट आणि नाटकांशी निगडित असलेली इतरही कामे केली आहेत. कॉलेजमध्ये शिकत असताना राजन खान यांची कथा वाचली होती. ती मला खूप आवडली होती. मध्यंतरीच्या काळात शिवाजी लोटन पाटील यांच्यासोबत ‘३१ डिसेंबर’ या हिंदी चित्रपटासाठी काम करताना या कथेवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम धर्मामध्ये आजही हलाला हा जाचक नियम आहे. याचा मुस्लिम भगिनींना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांच्याशी भेट घेतल्यावर जाणवले आणि या कथेवर चित्रपट बनवण्याचा निर्धार केला. माझे वडील पुण्यातील मुस्लीम सत्यशोधक समाजाचे सदस्य आहेत. त्यांच्यासोबत राजन खान यांना भेटलो. चित्रपट बनवताना बऱ्याच कायदेशीर आणि भावनिक अडचणी आल्या. त्यावर मात करत लक्ष्मण कागणे यांच्या लीडरशीपखाली संपूर्ण टिमने प्रचंड मेहनतीने ‘हलाल’ चित्रपट बनवला आहे. जे मुस्लीम बांधव हलालचा विषय घरात बोलणेही पाप मानतात, त्यांच्या मनात याबाबत जागरुकता निर्माण होणे हा यामागील मूळ हेतू आहे. 
भविष्यात चांगले चित्रपट बनवण्याचा अमोल यांचा मानस असून त्यातल्या दोन चित्रपटांवर सध्या त्याचे काम सुरू आहे. हलाल या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. निशांत धापसे यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. छायांकन रमणी रंजनदास यांनी केले आहे तर निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. सुबोध पवार आणि सय्यद अख्तर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे तर गायक-संगीतकार विजय गटलेवार यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. कार्यकारी निर्माते मिथिलेश सिंग राजपूत आहेत. 

Also Read : चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव यांचा हलाल ६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Web Title: Producer Amol Kangane produced the film Halal by overcoming many obstacles in the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.