पाठ फिरताक्षणीच कटू बोलणारे अनेक आसपास आहेत...! प्रसाद ओकची ही पोस्ट कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:52 PM2021-03-16T14:52:06+5:302021-03-16T14:54:13+5:30

प्रसाद ओकची एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. शिवाय या पोस्टसोबतच्या फोटोची तर त्याहीपेक्षा जबरदस्त चर्चा आहे.

prasad oak instagram post viral on social media share pic | पाठ फिरताक्षणीच कटू बोलणारे अनेक आसपास आहेत...! प्रसाद ओकची ही पोस्ट कोणासाठी?

पाठ फिरताक्षणीच कटू बोलणारे अनेक आसपास आहेत...! प्रसाद ओकची ही पोस्ट कोणासाठी?

googlenewsNext
ठळक मुद्देप्रसादचा ‘पिकासो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अमेझॉन प्राइमवर येत्या 19 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

नाटक, सिनेमा आणि मालिकांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर आपली जबरदस्त छाप पाडणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. याच प्रसाद ओकची एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. शिवाय या पोस्टसोबतचा प्रसादच्या फोटोची तर त्याहीपेक्षा जबरदस्त चर्चा आहे.
या फोटोत असे काय खास आहे, तर प्रसादने घातलेली लाल रंगाची टी-शर्ट आणि त्यावरचा मॅसेज. ‘देवाक काळजी,’ (देवालाच काळजी) असे या टी-शर्टवर लिहिलेले आहे. या फोटोसोबतची प्रसादची पोस्टही खास आहे. तोंडावर गोड बोलणारे आणि पाठ फिरताच निंदा नालस्ती करणा-यांना त्याने यातून सुनावले आहे.

प्रसाद लिहितो,
तोंडावर गोड बोलून
पाठ फिरताक्षणीच अत्यंत कडू बोलणारे किंवा अपरोक्ष निंदा करणारे,
अनेक मित्र, मैत्रिणी, नट, नट्या, दिग्दर्शक...सध्या आसपास आहेत...
माझा आत्मविश्वास ढळावा म्हणून
हे सगळे अविरत कार्यरत आहेत...
पण तरी माज्या चेहºयावरचं हसू
असंच कायम अबाधित आहे आणि राहणारच...
कारण 1) माझी कामावरची निष्ठा, 2) तुम्हा रसिकांचा सदैव असलेला पाठींबा आणि प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
3) देवाक काळजी...!!!
या तिन्ही गोष्टी शाबूत आहेत तोपर्यंत घाबरायचं कशाला????
तुज्या हाती आहे डाव सारा
इसर गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे...

आता प्रसादने ही पोस्ट नेमकी कोणाला उद्देशून आणि का लिहिली, ते माहित नाही. पण प्रसादचा हा नेम अनेकांच्या जिव्हारी लागला असावा, हे नक्की.

प्रसादचा ‘पिकासो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अमेझॉन प्राइमवर येत्या 19 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. काल या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.  शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग, तसेच सह-लेखक तुषार परांजपे यांनी केले आहे

Web Title: prasad oak instagram post viral on social media share pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.