या मराठी अभिनेत्रीचे फोटोशूट होतंय व्हायरल, फोटो पाहून म्हणाल, अप्रतिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:30 IST2020-01-16T06:30:00+5:302020-01-16T06:30:00+5:30

ब्युटीफुल, स्टनिंग, फॅब्युलस अशा कमेंट्स तिच्या फोटोवर येतायेत.

Prajakta mali looks geourses in black saree | या मराठी अभिनेत्रीचे फोटोशूट होतंय व्हायरल, फोटो पाहून म्हणाल, अप्रतिम

या मराठी अभिनेत्रीचे फोटोशूट होतंय व्हायरल, फोटो पाहून म्हणाल, अप्रतिम

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.


अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

प्राजक्ताने नुकतंच इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. प्राजक्ताचा साडीतले हे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. सोशल मीडियावर तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.


प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

Web Title: Prajakta mali looks geourses in black saree