नेहा पेंडसेनं सोडली 'भाभीजी घर पे है' मालिका?, यावर आता अभिनेत्रीनं केला हा महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:38 PM2021-05-24T14:38:21+5:302021-05-24T14:38:52+5:30

काही दिवसांपासून नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत दिसत नाही. त्यानंतर नेहाने देखील मालिका सोडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Nehha Pendse on rumours of quitting Bhabi Ji Ghar Par Hain! | नेहा पेंडसेनं सोडली 'भाभीजी घर पे है' मालिका?, यावर आता अभिनेत्रीनं केला हा महत्त्वाचा खुलासा

नेहा पेंडसेनं सोडली 'भाभीजी घर पे है' मालिका?, यावर आता अभिनेत्रीनं केला हा महत्त्वाचा खुलासा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हैमधील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच या मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा पेंडसे हिने एन्ट्री केली. मात्र आता असे म्हटले जात आहे की, अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा पेंडसेदेखील मालिकेला अलविदा करणार आहे.


काही दिवसांपासून नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत दिसत नाही. त्यानंतर नेहाने देखील मालिका सोडल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यानंतर आता नेहाने या अफवांवर खुलासा केला आहे.


टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, नेहा पेंडसेने सांगितले की, ही अफवा ऐकल्यानंतर मी अजिबात हैराण झाले नाही. कारण मी मागील काही भागांमध्ये दिसले नाही. ते जुने एपिसोड होते आणि त्या शूटिंगदरम्यान मी नव्हते. जेव्हा लोकांना मी मालिकेत दिसले नाही तेव्हा त्यांनी मला मेसेज केले. तेव्हा मला त्यांना सांगावे लागले की मी लवकर परत येणार आहे.


नेहा पेंडसेने पुढे सांगितले की, सध्या शूटिंग करणे खूप आव्हानात्मक आहे पण मी शूटिंगसाठी उत्साही आहे. आम्ही मालिकेचे शूटिंग सुरक्षित ठिकाणी करणार आहे आणि ज्या कलाकारांसोबत करणार ज्यांची कोव्हिड १९ची टेस्ट निगेटिव्ह असेल. तसेच नेहाने हेदेखील म्हटले की, सुरूवातीला लोकांनी माझी तुलना सौम्यासोबत केली होती मात्र हळूहळू लोकांनी माझा स्वीकार केला. आता मी या भूमिकेत पूर्णपणे फिट बसले आहे.


मुंबईत लॉकडाउन असल्यामुळे मालिकांचे शूटिंग थांबले आहे. अशात भाभीजी घर पर हैचे शूटिंग सूरतमध्ये होते आहे आणि संपूर्ण कास्ट आणि क्रूचे सदस्य एका हॉटेलमध्ये बायो बबल बनवण्यात आले आहे. तिथेच सर्व राहणार आहेत.

Web Title: Nehha Pendse on rumours of quitting Bhabi Ji Ghar Par Hain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.