सुबोध भावेने केला पुणे मेट्रोने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 11:16 IST2023-08-03T11:15:09+5:302023-08-03T11:16:11+5:30

"मेट्रो एवढी रिकामी कशी?", सुबोध भावेचा फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

marathi actor subodh bhave travel in pune metro shared photo netizens react | सुबोध भावेने केला पुणे मेट्रोने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाला...

सुबोध भावेने केला पुणे मेट्रोने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाला...

सुबोध भावे हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. विविधांगी भूमिका साकारुन अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी सुबोध एक आहे. सुबोध सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल पोस्टच्या माध्यमातून तो चाहत्यांना माहिती देत असतो. सुबोध समाजातील अनेक घडामोडींबद्दलही पोस्टमधून व्यक्त होताना दिसतो. 

सुबोधने नुकताच पुणे मेट्रोतून प्रवास केला. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सुबोधने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मेट्रोमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने "पुणे मेट्रो" असं कॅप्शन दिलं आहे. सुबोध भावेचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "आयुष्यात इतकी रिकामी मेट्रो मिळायला हवी," अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "मेट्रो एवढी रिकामी कशी", असंही एकाने म्हटलं आहे. तर अनेकांनी वाह, मस्तच अशा कमेंटही केल्या आहेत. 

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

सुबोधने 'बालगंधर्व', 'वाळवी', 'कट्यार काळजात घुसली', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य : एक युगपुरुष' अशा हिट चित्रपटात काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. 'हर हर महादेव' या चित्रपटात तो पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. सुबोधची झी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 

Web Title: marathi actor subodh bhave travel in pune metro shared photo netizens react