ऐश्वर्या राय बच्चनची कार्बन कॉपी आहे ही मराठी अभिनेत्री, सोशल मीडियावर अशाप्रकारे होते ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 16:15 IST2020-06-09T16:12:58+5:302020-06-09T16:15:58+5:30
एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

ऐश्वर्या राय बच्चनची कार्बन कॉपी आहे ही मराठी अभिनेत्री, सोशल मीडियावर अशाप्रकारे होते ट्रेंड
''वाट बघतोय रिक्षावाला''..... या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईकचा सोशल मीडियावर बोलबाला असतो.मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती स्वतःचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवादही साधते. मराठी चित्रपटसृष्टीची ऐश्वर्या राय म्हणूनही तिला ओळखले जाते.
ऐश्वर्या सारखेच साम्य तिच्या चेह-यात आहे. हुबेहुब ऐश्वर्यासारखी ती अनेकांना भासते. तिची स्टाइलही ती ऐश्वर्यासारखीच ठेवण्याचा प्रयत्न करते. इतकेच काय तर मध्यंतरी तिने पांरपरिक अंदाजातील शेअर केलेल्या फोटोंना पाहून अनेकांनी ऐश्वर्यासारखीच दिसत असल्याच्या कमेंटसद्वारे म्हटले होते. तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळाले होते.
मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत. एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
तसेच तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत नात्यात असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना नुकतेच सांगितले होते.
प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे.प्रदीप इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात.