बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही? ‘या’ नेत्याने दिले निवडणूक लढवण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 20:48 IST2026-03-16T20:48:06+5:302026-03-16T20:48:56+5:30

Baramati Assembly By-Election: बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढवणारअसून, अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एका विधानामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

Will the Baramati Assembly by-election not go unopposed? OBC leader Laxman Hake hints at contesting the election | बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही? ‘या’ नेत्याने दिले निवडणूक लढवण्याचे संकेत

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही? ‘या’ नेत्याने दिले निवडणूक लढवण्याचे संकेत

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीविधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोट निवडणूक जाहीर केली आहे. ही पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढवणारअसून, अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एका विधानामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके हे आज बारामती विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके यांनी अनेक गावांना भेट दिली. तसेच बारामतीमधील विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करत असल्याने लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

या संदर्भात हाके म्हणाले की, आम्ही बारामतीमधील वाड्या वस्त्यांना भेट दिली आहे. निवडणूक लढवली पाहिजे म्हणून शेकडो तरुण कार्यकर्त्यांचे फोन आले आहेत. मात्र त्यांच्या मनात काय नक्की आहे, हे अधिक जाणून घ्यायला मला आवडेल. याबाबत एक दोन दिवसांमध्ये आम्ही जाहीर भूमिका घेऊ, असे हाके यांनी सांगितले.

मी ओबीसींच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. संविधानिक बाजू मांडत आहे. काही आंदोलने करतोय. बारामती मला नवीन नाही. बारामतीमधील प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये खेड्यामध्ये मी आधी जाऊन आलेलो आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीचं महत्त्व काय असतं, हे आम्ही लोकांना समजावून सांगू, असेही हाके यावेळी म्हणाले. 

Web Title : बारामती उपचुनाव: क्या निर्विरोध चुनाव में बाधा? ओबीसी नेता ने चुनाव लड़ने का संकेत दिया

Web Summary : अजित पवार के निधन से आवश्यक बारामती उपचुनाव निर्विरोध नहीं हो सकता। सुनेत्रा पवार को निर्विरोध निर्वाचित करने के प्रयास जारी हैं, लेकिन ओबीसी नेता लक्ष्मण हाके की संभावित उम्मीदवारी से खतरा है। हाके ने समर्थकों की मांग पर चुनाव लड़ने का संकेत दिया।

Web Title : Baramati By-Election: Obstacle to Unopposed Election? OBC Leader Hints at Contest

Web Summary : Baramati by-election, necessitated by Ajit Pawar's death, may not be unopposed. While efforts are on to elect Sunetra Pawar unopposed, OBC leader Laxman Hake's potential candidacy threatens this. Hake, after visiting Baramati, indicated he might contest due to supporters' demands, leaving the possibility open.