'हिरवे साप स्वतःचा इतिहास विसरले...', नितेश राणेंची इम्तियाज जलीलांवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 15:46 IST2026-01-25T15:45:48+5:302026-01-25T15:46:26+5:30

Nitesh Rane on Imtiaz Jaleel : 'हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे भगवेच राहणार.'

Nitesh Rane on Imtiaz Jaleel: 'Green snakes have forgotten their own history', Nitesh Rane's criticism of Imtiaz Jaleel | 'हिरवे साप स्वतःचा इतिहास विसरले...', नितेश राणेंची इम्तियाज जलीलांवर जहरी टीका

'हिरवे साप स्वतःचा इतिहास विसरले...', नितेश राणेंची इम्तियाज जलीलांवर जहरी टीका

Nitesh Rane on Imtiaz Jaleel : महापालिका निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर मुंब्र्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (AIMIM) च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्याला माजी खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तिजाय जलील यांनी दिलेल्या समर्थनानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, या विधानावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी जहरी शब्दात टीका केली आहे. 

इतिहास विसरू नका...

मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे अत्यंत कठोर शब्दांत म्हणाले, 'हा हिरवा साप(इम्तियाज जलील) कदाचित आपला इतिहास विसरला आहे. औरंगजेब आणि टीपूने महाराष्ट्राला ‘हिरवे’ करण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यांना या भूमीत पुरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहास घडवला आहे,' अशी जहरी टीका राणेंनी केली. 

हिंदू राष्ट्रावर ठाम भूमिका

राणे यांनी पुढे म्हणाले, 'जितक्या लवकर ते आपला इतिहास समजून घेतील, तितक्या लवकर त्यांना कळेल की, हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे भगवेच राहणार.' औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख करत राणे म्हणाले, 'जो कोणी हिंदू राष्ट्राला हरवण्याचे स्वप्न पाहील, त्याला महाराष्ट्रातील हिंदू औरंगजेबाच्या कबरमध्ये पुरतील.' दरम्यान, राणेंच्या प्रतिक्रियेवर अद्याप जलील काय बोलतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

नेमका वाद काय ?

AIMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाला पाठिंबा देताना इम्तियाज जलील यांनी, 'सहर शेख यांचे विधान हे पक्षाचे अधिकृत मत आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू', असे म्हटले होते. याच विधानावर नितेश राणेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title : राणे ने जलील पर साधा निशाना: 'हरे सांप' इतिहास भूले, महाराष्ट्र रहेगा भगवा।

Web Summary : नितेश राणे ने एआईएमआईएम पार्षद के महाराष्ट्र को हरा करने वाले बयान पर इम्तियाज जलील के समर्थन की आलोचना की। राणे ने जोर देकर कहा कि महाराष्ट्र एक हिंदू राष्ट्र है और भगवा ही रहेगा, जलील को 'हरा' करने की कोशिश करने वालों की ऐतिहासिक हारों की याद दिलाई।

Web Title : Rane slams Jaleel: 'Green snakes' forgot history, Maharashtra will remain saffron.

Web Summary : Nitesh Rane criticized Imtiaz Jaleel's support for AIMIM corporator's statement about turning Maharashtra green. Rane asserted Maharashtra is a Hindu nation and will remain saffron, reminding Jaleel of historical defeats of those who sought to 'green' the land.