Mayor Reservation: ठाणे, जालना आणि लातूरमध्ये आता 'अनुसूचित जाती'चा महापौर; राजकीय गणिते बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:17 IST2026-01-22T12:16:38+5:302026-01-22T12:17:03+5:30

Thane, Jalna, Latur Mayor Reservation: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले.

Mayors giving up reservation: Thane, Jalna and Latur now have 'Scheduled Caste' mayors; Political calculations have changed! | Mayor Reservation: ठाणे, जालना आणि लातूरमध्ये आता 'अनुसूचित जाती'चा महापौर; राजकीय गणिते बदलली!

Mayor Reservation: ठाणे, जालना आणि लातूरमध्ये आता 'अनुसूचित जाती'चा महापौर; राजकीय गणिते बदलली!

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. यामध्ये अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे, नव्याने महापालिका झालेल्या जालना आणि मराठवाड्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या लातूर महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

प्रमुख शहरांमधील आरक्षणाची स्थिती:
ठाणे महानगरपालिका: ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ला मानले जाते. येथे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने आता या प्रवर्गातील कोणत्या नगरसेवकाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जालना महानगरपालिका: जालन्याची ही महापालिका म्हणून पहिलीच निवडणूक झाली असून, पहिल्याच टर्ममध्ये येथे अनुसूचित जातीचा महापौर विराजमान होणार आहे. येथे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महिलेसाठी हे महापौरपद आरक्षित झाले आहे.

लातूर महानगरपालिका: लातूरमध्ये काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे (४३ जागा). त्यामुळे येथे काँग्रेसचा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला नगरसेवक महापौर बनणार हे आता निश्चित झाले आहे.

आरक्षण सोडतीचे महत्त्वाचे मुद्दे:
यंदा १५ महापालिकांमध्ये महिला महापौर असणार आहेत, तर १४ ठिकाणी पुरुष किंवा सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळेल. २०११ च्या जनगणनेच्या आधारे आणि मागील २० वर्षांतील आरक्षणाचा विचार करून 'चक्राकार' पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीकडे या प्रवर्गातील किती उमेदवार आहेत, याची चाचपणी सुरू झाली आहे. जालन्यात भाजपचा तर लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title : ठाणे, जालना, लातूर में अनुसूचित जाति के महापौर; राजनीतिक समीकरण बदले!

Web Summary : ठाणे, जालना और लातूर में महापौर पद अनुसूचित जाति के लिए आरक्षित। शिंदे के गढ़ ठाणे में बदलाव। जालना को पहला एससी महापौर मिला, जबकि लातूर में कांग्रेस का दबदबा, एससी महिला महापौर का मार्ग प्रशस्त।

Web Title : Thane, Jalna, Latur Mayors Reserved for Scheduled Castes; Politics Shift!

Web Summary : Thane, Jalna, and Latur mayoral posts are now reserved for Scheduled Castes. Thane, a Shinde stronghold, sees a shift. Jalna gets its first SC mayor, while Congress dominates in Latur, paving the way for an SC woman mayor.