Maharashtra Mayor Reservation 2026: महापौर आरक्षण २०२६: मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:06 IST2026-01-22T13:05:07+5:302026-01-22T13:06:46+5:30
Maharashtra Mayor Reservation 2026 Full List: २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेली सर्व २९ महानगरपालिकांची महापौर आरक्षण यादी. मुंबई, पुणे, नागपूर खुला प्रवर्ग; ठाणे, जालना SC आरक्षण. पहा सविस्तर.

Maharashtra Mayor Reservation 2026: महापौर आरक्षण २०२६: मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर...
मुंबई: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. एकूण २९ महापालिकांपैकी १७ ठिकाणी खुला प्रवर्ग, ८ ठिकाणी ओबीसी, ३ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
१. खुला प्रवर्ग (Open Category) - १७ शहरे
या प्रवर्गातून कोणताही नगरसेवक महापौर बनू शकतो. मात्र, काही ठिकाणी महिला आरक्षण असल्याने तिथे चुरस वाढली आहे.
महानगरे: मुंबई (महिला), नवी मुंबई (महिला), पुणे (महिला), छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड (महिला).
इतर शहरे: अमरावती, भिवंडी (महिला), वसई-विरार, मीरा भाईंदर (महिला), मालेगाव (महिला), परभणी, सोलापूर, नांदेड (महिला), धुळे (महिला), सांगली.
२. ओबीसी (OBC) प्रवर्ग - ८ शहरे
यातील ४ ठिकाणी महिलांसाठी विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे.
जळगाव: ओबीसी (महिला)
चंद्रपूर: ओबीसी (महिला)
अहिल्यानगर (अहमदनगर): ओबीसी (महिला)
अकोला: ओबीसी (महिला)
इचलकरंजी: ओबीसी (सर्वसाधारण)
कोल्हापूर: ओबीसी (सर्वसाधारण)
पनवेल: ओबीसी (सर्वसाधारण)
उल्हासनगर: ओबीसी (सर्वसाधारण)
३. अनुसूचित जाती (SC) - ३ शहरे
जालना: अनुसूचित जाती (महिला)
लातूर: अनुसूचित जाती (महिला)
ठाणे: अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
४. अनुसूचित जमाती (ST) - १ शहर
कल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)