भंडारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 21:58 IST2021-03-02T21:57:42+5:302021-03-02T21:58:04+5:30

दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना मोहाडी तालुक्यात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. तिघांच्या डोक्याला मार लागला आहे. 

5 injured in two separate accidents in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ५ जखमी

भंडारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ५ जखमी

मोहाडी (भंडारा) :  दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना मोहाडी तालुक्यात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. तिघांच्या डोक्याला मार लागला आहे. 

मोहाडी येथे पालडोंगरी कडून भंडाराकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात टिप्परने धडक दिली. त्यात राहूल गणेश पाटील (२८), निशा पाटील (२४), प्रतीक्षा राहूल पाटील( २३), ग्रितेश राहूल पाटील (अडीच वर्ष) सर्व रा. भंडारा अशी जखमींची नावे आहे. यात राहुल पाटील व निशा पाटील गंभीर जखमी आहे. तर छोट्या बालकाच्या तोंडाला दुखापत झाली आहे. जखमींना भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 


 दुसऱ्या घटनेत सुकळी येथील गणेश लक्ष्मण पातरे (५०) हा जखमी झाला.  त्याच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप कळालेली नाही. मोहाडी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: 5 injured in two separate accidents in Bhandara district