जालन्यात रावसाहेब दानवेचे बंधू भास्कर दानवे आणि भावजय सुशीला दानवे विजयी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:14 IST2026-01-16T12:13:28+5:302026-01-16T12:14:45+5:30

प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे पाचही उमेदवार विजयी.

Jalna Municipal Corporation Election 2026: Raosaheb Danve's brother Bhaskar Danve and Sister-in-law Sushila Danve won in Jalna | जालन्यात रावसाहेब दानवेचे बंधू भास्कर दानवे आणि भावजय सुशीला दानवे विजयी...

जालन्यात रावसाहेब दानवेचे बंधू भास्कर दानवे आणि भावजय सुशीला दानवे विजयी...

Jalna Municipal Corporation Election 2026: जालना जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत 16 प्रभागांतील 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. दरम्यान, महापालिकेच्या या पहिल्याच निवडणुकीत दानवे कुटुंबासाठी आनंदाची बातमी आली आहे.

जालना महानगरपालिकेत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे, यादेखील निवडून आल्या आहेत. या विजयासह दानवे कुटुंबाचे महापालिकेतील वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

युती तुटल्याने बदलली राजकीय समीकरणे

निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात युती होण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र या बैठका निष्फळ ठरल्या आणि अखेर जालना महानगरपालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मनसे यांची युती पाहायला मिळाली. महाविकास आघाडीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत झाली. याशिवाय अनेक अपक्ष उमेदवारांनीही दिग्गज उमेदवारांना कडवी टक्कर दिली. 

शहरातील 291 मतदान केंद्रांवर गुरुवारी (15 जानेवारी 2026) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. 

Web Title : जालना में दानवे परिवार की बड़ी जीत, रावसाहेब दानवे के भाई विजयी

Web Summary : जालना नगर निगम चुनाव में रावसाहेब दानवे के भाई भास्कर दानवे और उनकी पत्नी सुशीला दानवे विजयी हुए। गठबंधन टूटने से अलग-अलग दलों ने चुनाव लड़ा। चुनाव में मतदाताओं ने उत्साह दिखाया और हर वार्ड में कड़ी टक्कर देखने को मिली।

Web Title : Danve Family Wins Big in Jalna Municipal Corporation Elections

Web Summary : Raosaheb Danve's brother, Bhaskar Danve, and his wife, Sushila Danve, won the Jalna Municipal Corporation election. Alliances fractured, leading to independent contests. The election saw high voter turnout and intense competition in all wards.