Johnny Depp’s ex-security guard says he acts like Jack Sparrow in real life | जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेपबाबत त्याच्या एक्स-बॉडीगार्डकडून खुलासा, पत्नीबाबतही म्हणाला....

जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेपबाबत त्याच्या एक्स-बॉडीगार्डकडून खुलासा, पत्नीबाबतही म्हणाला....

हॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेता जॉनी डेप सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सोमवारी जॉनी डेपची पत्नी अंबर हर्डने कोर्टात सांगितले की, घटस्फोटीत पती जॉनीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर जॉनीने सांगितले की, होते की, त्या रात्री पत्नीने त्याला पंच मारला होता. तेव्हाच त्याला जाणीव झाली होती की, त्याने ६५० मिलियन डॉलर गमावले आहेत. अशात आता जॉनीच्या माजी गार्ड त्याच्याबाबत एक खुलासा केला आहे.

जॉनी डेपचा माजी सिक्युरिटी गार्ड रिक वूडने खुलासा केला आहे की, जॉनी हा त्याच्या रेग्युलर लाइफमध्येही बराचसा जॅक स्पॅरो भूमिकेसारखाच वागतो. तो कॅरेक्टरमधून बाहेर आलेला नाही. हा सिक्युरिची गार्ड २०१५ दरम्यान जॉनीकडे कामाला होता. पायरेट्स ऑफ द कॅरेबियन सीरिजमधील जॉनीची जॅक स्पॅरो ही भूमिका फारच गाजली. या भूमिकेमुळे तो हॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाऊ लागला. आता ही फारच आश्चर्याची बाब आहे की, तो रेग्युलर लाइफमध्येही जॅक स्पॅरोसारखा वागतो.

तसेच या गार्डने जॉनीच्या वागण्याबाबतही सांगितले की, जॉनीने कधीही त्याच्या नव्या पत्नीवर अत्याचार केल्याचं किंवा मारझोड केल्याचं पाहिलं नाही. तसेच तसे काही संकेतही दिसले नाहीत. पण २०१८ मधील एका लेखात जॉनीचा “wife-beater” असा उल्लेख करण्यात आला होता.

२०१७ मध्ये वेगळे झालेल्या कपलने नंतर एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले. अजूनही त्यांची केस लंडन कोर्टात सुरू आहे. मात्र, जॉनीने त्याच्यावर घटस्फोटीत पत्नीकडून लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. पण दोघांचा काही संपलेला नाही आणि सिनेमापेक्षा या वादामुळेच ते जास्त चर्चेत राहतात.

ब्रॅड पिटला घटस्फोट दिल्यानंतर त्याची एक्स वाइफ अँजेलिना जोलीची ही धक्कादायक बाब आली समोर, वाचून व्हाल हैराण 

प्रेग्नंट आहे पॉप सिंगर निकी मिनाज, बेबी बम्पचे फोटो शेअर करत दिली गोड बातमी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Johnny Depp’s ex-security guard says he acts like Jack Sparrow in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.