अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. पाठोपाठ दोघांनी घटस्फोटही घेतला. खरे तर घटस्फोटाच्या दोनच वर्षे आधी दोघांनी लग्न केले होते. आता असे बोलले जात आहे की अँजोलिना बायसेक्शुअल आहे, ब्रॅडसोबत विभक्त झाल्यानंतर तिने बऱ्याच पुरूषांना डेट केले आणि बऱ्याच महिलांनाही.

द टेक एज्युकेशन वेबसाइटच्या वृत्तानुसार, भूतकाळात अँजोलिनाने बऱ्याच महिलांना डेट केले होते. इतकेच नाही तर तिचे त्यांच्यासोबत शारिरीक संबंधदेखील होते. आता ब्रॅडसोबत वेगळे झाल्यानंतर तिने पुन्हा महिलांना डेट करायला सुरूवात केली आहे. मात्र अद्याप याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अँजोलिना खासगी आयुष्य खासगी ठेवायला जास्त प्राधान्य देते. ती जगाची पर्वा अजिबात करत नाही. ती तिच्या मुलांबद्दल खूप जागरूक आहे.

अँजेलिनाआणि ब्रॅड 2005 पासून एकत्र होते. मिस्टर अँड मिसेस स्मिथ आणि बाय द सी या चित्रपटात ते एकत्र दिसले. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांनी भावली. त्यांच्या नात्याची चर्चा हॉलिवूडमध्ये बराच काळ चालली.

अखेर नऊ वर्षांनंतर 2014 साली ब्रॅड व अँजेलिना विवाहबंधनात अडकले होते. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 45 वर्षांची अँजेलिना व ब्रॅड पिट यांना 6 मुलं आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जहरा, शिलोह, नॉक्स आणि विवियन अशी या मुलांची नावे आहेत.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After the divorce of Brad Pitt, his ex-wife Angelina Jolie's shocking case came to light.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.