व्वा!! गर्भवती कॅरोलचा रॅम्प वॉक़..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 19:39 IST2016-04-01T02:37:25+5:302016-03-31T19:39:39+5:30
मॉडेलिंग वर्ल्डमध्ये रॅम्पवर चालणाºया मॉडेलचे वजन हा आजही वादाचा विषय आहे. रॅम्पवर चालणारी मॉडेल म्हणजे झिरो फिगरच हवी, असा ...
.jpg)
व्वा!! गर्भवती कॅरोलचा रॅम्प वॉक़..
म डेलिंग वर्ल्डमध्ये रॅम्पवर चालणाºया मॉडेलचे वजन हा आजही वादाचा विषय आहे. रॅम्पवर चालणारी मॉडेल म्हणजे झिरो फिगरच हवी, असा जणू अलिखित नियमच आहे. अशात एका मॉडेलने आपल्या बेबी बम्पसोबत रॅम्प वॉक करणे, ही खमंग चर्चेची बातमी ठरली आहे. कॅरोल ग्रेसिअस असे या मॉडेलचे नाव आहे. कॅरोल हे मॉडेलिंग विश्वातील मोठे नाव.‘फॅशन’ या चित्रपटातही तिने लहानशी भूमिका केली होती. अर्थात ती रॅम्पवर चालणाºया मॉडेलचीच. गेल्या अनेक वर्षांपासून कॅरोल ही देशातील टॉपची मॉडेल बनून आहे. अलीकडे तिने एक आदर्श उदाहरण सर्वांना घालून दिले. गर्भवती असलेली कॅरोल आपल्या बेबी बम्पसोबत रॅम्पवर आली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण कॅरोलने मात्र आपल्या नेहमीच्या आत्मविश्वासाने आपले रॅम्प वॉक पूर्ण केले. डिझायनर गौरव शहा याने डिझाईन केलेल्या पिंक आणि ग्रीन साडीत कॅरोल रॅम्पवर आली...आणि तिने अक्षरश: सर्वांनाच जिंकले...
![]()