युजवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आर जे महावश पडली आजारी, इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 10:10 IST2025-05-14T10:09:33+5:302025-05-14T10:10:02+5:30
आरजे महावशने तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली असून सध्या आजारी असल्याचं सांगितलं आहे.

युजवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आर जे महावश पडली आजारी, इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली माहिती!
Yuzvendra Chahal Rj Mahvash: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सध्या अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव आरजे महावश हिच्याशी जोडलं जात आहे. सोशल मीडिया पोस्ट्स, फोटो आणि व्हिडीओमुळे ते कायम लक्ष वेधून घेतात. युजवेंद्र चहलची ही कथित गर्लफ्रेंड आरजे महावश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी एका वेगळ्या कारणामुळे. आरजे महावशने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली असून सध्या आजारी असल्याचं सांगितलं आहे.
आर जे महावश सोशल मीडियावर सक्रिय असते. आयुष्यातील अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिन आजारी पडल्याचं सांगितलं आहे. आर जे महावश हिला डेंग्यूची (Rj Mahvash Infection Dengue) लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवरुन ही माहिती दिलीये. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने लिहलं 'डेंग्यू झाला मित्रांनो'. त्यासोबत तिनं डासाच्या आवाजाचं म्युजिकही लावलंय. चाहत्यांनी तिला 'लवकर बरे हो' असे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे.
धनश्री वर्माशी घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र हा आरजे महावशच्या प्रेमात असल्याचं बोललं जात आहे. त्या दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आरजे महावश खास युजवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी पंजाबचे सामने पाहायला जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. अलिकडेच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यामध्ये चहलने हॅटट्रीक घेतली. हॅटट्रीक घेतल्यानंतर चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावशने इन्स्टास्टोरी शेअर करत चहलचे कौतुक केलं होतं. तर आरजे महावशच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टवर युजवेंद्रचं लाईक्स असल्याचं चाहत्यांनी हेरलंय.
आर जे महावशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'प्यार पैसा और प्रॉफिट' वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ही वेब सिरीज ७ मे २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. पहिल्याच सिरीजमध्ये तिनं बोल्ड सीन दिले आहेत. आर जे महावश ही खूप लोकप्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल २.७ मिलीयन्स फॉलोवर्स आहेत.