"बरबाद केलंस..", इमरानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील भूमिकेमुळे मुलगा नाराज, शाळेतील मित्र चिढवताहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:22 IST2025-10-31T13:22:11+5:302025-10-31T13:22:58+5:30
Emraan Hashmi : आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील प्रत्येक कलाकाराच्या कामाचे कौतुक झाले. यात काही अभिनेत्यांनी कॅमिओदेखील केला होता, ज्यात इमरान हाश्मीचे नाव समाविष्ट आहे.

"बरबाद केलंस..", इमरानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील भूमिकेमुळे मुलगा नाराज, शाळेतील मित्र चिढवताहेत
आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील प्रत्येक कलाकाराच्या कामाचे कौतुक झाले. यात काही अभिनेत्यांनी कॅमिओदेखील केला होता, ज्यात इमरान हाश्मीचे नाव समाविष्ट आहे. त्याने या सीरिजमध्ये एका इंटीमेसी कोचची भूमिका साकारली होती, जो सहर बंबा आणि लक्ष्य यांच्या व्यक्तिरेखांना प्रशिक्षण देतो. आता महिनाभरानंतर त्याच्या १५ वर्षांच्या मुलाने वडिलांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. या भूमिकेमुळे त्याला लाज वाटल्याचे त्याने सांगितले.
'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत इमरान हाश्मी यांना विचारण्यात आले की, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये त्यांचे काम पाहिल्यानंतर त्याच्या मुलाची प्रतिक्रिया काय होती, तेव्हा अभिनेता म्हणाला की, ''मला माहीत नाही की हे कॅमेऱ्यावर सांगायला हवे की नाही, पण त्याला खरोखरच लाज वाटली आहे. शाळेत अशा सोसायट्या असतात, जिथे तुम्ही गोष्टी शिकवता किंवा तुमचे काम करता, त्यामुळे त्याचे सगळे मित्र आता त्याला विचारत आहेत की, तू इंटीमेसी कोच का होत नाहीस?''
अयानला मित्र चिढवतात
इमरानने पुढे सांगितले की, त्याच्या मुलाने त्याला सांगितले की, त्याने शाळेत त्याच्यासाठी ''सगळ्या गोष्टी पूर्णपणे खराब करून टाकल्या आहेत.'' आणि आता यावरून दोघांमध्ये गमतीशीर चर्चा होते. त्याच्या मुलाचे नाव अयान आहे आणि त्याने आपल्या वडिलांना सांगितले की, जेव्हा तो शाळेत जातो, तेव्हा त्याला केवळ या भूमिकेमुळे त्रास दिला जातो. तो इमरानला म्हणाला की, ''आता पुरे करा.''
आगामी चित्रपट
इमरान हाश्मीने न्यूज एजेन्सी पीटीआयला त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले होते की, या सीरिजमध्ये त्याची तीच प्रतिमा आहे, जी लोकांना त्यांच्याबद्दल आवडते. अभिनेता आणि राघव जुयाल यांच्यात चित्रीत झालेला सीन हा अभिनेत्यासोबत वास्तविक जीवनात घडलेल्या एका घटनेपासून प्रेरित होता, जिथे एक चाहता त्याला पाहून त्याच पद्धतीने गाणे गाऊ लागतो. इमरानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच यामी गौतमसोबत 'हक' या चित्रपटात दिसणार आहे, जो ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
