भयंकर आहे 'या' सीरिजची कथा, OTT वर होतेय तुफान ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:02 IST2025-07-27T17:02:17+5:302025-07-27T17:02:29+5:30

ओटिटीवर धुमाकूळ घालतेय ही सीरिज, तुम्ही पाहिली का?

Vaani Kapoor Crime Thriller Mandala Murders Trending Number 1 On Ott Platform Netflix | भयंकर आहे 'या' सीरिजची कथा, OTT वर होतेय तुफान ट्रेंड

भयंकर आहे 'या' सीरिजची कथा, OTT वर होतेय तुफान ट्रेंड

ओटीटी हे सध्या सिनेप्रेमींसाठी सर्वात लोकप्रिय माध्यम बनलं आहे. प्रेक्षक दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत असतात. जर तुम्हीही या आठवड्यात काही उत्तम सीरिजच्या शोधात असाल, तर ही सीरिज तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच सर्वत्र चर्चेत आली आहे. ती म्हणजे 'मंडला मर्डर्स (Mandala Murders)'.

'मंडला मर्डर्स' ही ८ एपिसोड असलेली सस्पेन्स थ्रिलर सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये नंबर-१ वर आहे. या सीरिजमध्ये काळी जादू, गूढ खून, अंधश्रद्धा आणि पोलिस तपासाचा थरार यांचा सुरेख संगम पाहायला मिळतोय. सीरिजमधील प्रत्येक खून विचित्र आणि धक्कादायक पद्धतीने घडतो. मृतदेहांपासून शरीराचे अवयव गायब होणं, त्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे, हे उलगडण्यासाठी एक महिला सीआयडी अधिकारी राज्यात दाखल होते आणि तिथून सिरीजची खरी कथा सुरू होते.

धर्म आणि विज्ञानावर आधारित 'मंडला मर्डर्स' या सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही सिरीज प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवत आहे.  जर तुम्ही ती अजून पाहिली नसेल, तर नक्कीच नेटफ्लिक्सवर एकदा पाहून अनुभव घ्या.

Web Title: Vaani Kapoor Crime Thriller Mandala Murders Trending Number 1 On Ott Platform Netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.