शशांक केतकरला लॉटरी लागली! करण जोहरच्या सीरिजमध्ये झळकणार; म्हणतो- भूमिका छोटी आहे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:27 PM2024-02-12T12:27:44+5:302024-02-12T12:27:44+5:30

करण जोहरचं प्रोडक्शन असलेल्या वेब सीारिजमध्ये शशांकची वर्णी लागली आहे.

tv actor shashank ketkar to play role in karan johar dharma production show time web series | शशांक केतकरला लॉटरी लागली! करण जोहरच्या सीरिजमध्ये झळकणार; म्हणतो- भूमिका छोटी आहे, पण...

शशांक केतकरला लॉटरी लागली! करण जोहरच्या सीरिजमध्ये झळकणार; म्हणतो- भूमिका छोटी आहे, पण...

अनेक मालिकांमध्ये काम करून मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'होणार सून मी ह्या घरची'मालिकेत मुख्य भूमिका साकारून शशांक घराघरात पोहोचला. पहिल्याच मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये शशांक महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. आता शशांक करण जोहरच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. 

शशांक केतकरला लॉटरी लागली आहे. करण जोहरचं प्रोडक्शन असलेल्या वेब सीारिजमध्ये शशांकची वर्णी लागली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शशांकने ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'शो टाइम' या डिस्ने प्लस हॉटस्टारवरील वेब सीरिजमध्ये शशांक झळकणार आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन करण जोहरच्या ऑफिसमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने "शो टाइम! ८ मार्चपासून फक्त डिस्ने प्लस हॉटस्टारवर. जेव्हा तुम्ही धर्माच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी जाता तेव्हा कुछ कुछ होता है! काम छोटसं आहे, पण आठवणीत राहणारं आहे," असं कॅप्शन दिलं आहे. शशांकच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याला चाहत्यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. 

करण जोहरच्या 'शो टाइम' वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, नसरुद्दीन शाह, मौनी रॉय, माहिमा मखवाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. याआधी शशांक 'स्कॅम २००३' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

Web Title: tv actor shashank ketkar to play role in karan johar dharma production show time web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.