The Greatest Rivalry India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान मॅचवर येतेय सीरिज! नेटफ्लिक्सवर या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:02 IST2025-01-13T13:00:21+5:302025-01-13T13:02:41+5:30

भारत-पाकिस्तान मॅचवर आता डॉक्यूमेंट्री सीरिज येणार असून सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.

The Greatest Rivalry India Vs Pakistan netflix documentry series release date | The Greatest Rivalry India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान मॅचवर येतेय सीरिज! नेटफ्लिक्सवर या तारखेला होणार रिलीज

The Greatest Rivalry India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान मॅचवर येतेय सीरिज! नेटफ्लिक्सवर या तारखेला होणार रिलीज

भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी असते. भारत-पाकिस्तानचे जेव्हाही सामने होतात तेव्हा क्रिकेटवेडी माणसं टीव्हीसमोर ठाण मांडून बसली असतात. आजवर भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंमध्ये अनेक शाब्दिक वादही झाले. या भांडणांची स्टेडियमवर आणि स्टेडियमबाहेरही चांगली चर्चा झाली. आजही भारत-पाकिस्तान सामन्याच्या जुन्या किल्प्स आवर्जुन पाहिल्या जातात. यावर आधारीत The Greatest Rivalry India Vs Pakistan ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. जाणून घ्या.

The Greatest Rivalry India Vs Pakistan वेबसीरिजविषयी

सोशल मीडियावर नुकतीच The Greatest Rivalry India Vs Pakistan या वेबसीरिजची घोषणा करण्यात आलीय. या सीरिजमध्ये क्रिकेटच्या जगतात एकमेकांचे शत्रू अशी ओळख असणारे संघ भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानच्या आणि सामन्याबाहेरच्या काही रंजक गोष्टी बघायला मिळणार आहेत. या वेबसीरिजचं पोस्टर रिलीज झालं असून सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग पाठमोरे दिसत आहेत. त्यांच्यासमोर पाकिस्तानचा संघ पाहायला मिळतोय. पोस्टर पाहताच नेटकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.


कधी अन् कुठे पाहाल ही वेबसीरिज?

 The Greatest Rivalry India Vs Pakistan ही वेबसीरिज ७ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्यामुळे या वेबसीरिजची क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजमध्ये सचिन, सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली यांचे पाकिस्तानी टीममधील शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, कामरान अकमल या खेळाडूंसोबत झालेले वाद दिसतील. याशिवाय भारत-पाकिस्तान दरम्यान ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं असतं, आर्थिक गणितं, सट्टेबाजी अशाही विषयांना ही वेबसीरिज स्पर्श करण्याची शक्यता आहे.

Web Title: The Greatest Rivalry India Vs Pakistan netflix documentry series release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.