‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:28 IST2025-04-25T15:27:40+5:302025-04-25T15:28:51+5:30

मनोज वाजपेयीची गाजलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन ३’बद्दल अभिनेता जयदीप अहलावत याने एक मोठी अपडेट शेअर केली आहे. या सीरिजच्या नव्या सीझनमध्ये एका जुन्या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार आहे.

The Family Man web series famous character Chellam Sir is back in third season jaideep ahlawat confirms | ‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश

The Family Man 3 Update: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याची ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज ओटीटी विश्वात चांगलीच गाजली होती. या सीरिजचे दोन सीझन प्रेक्षक भेटीला आले आहेत. आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा सीरिजच्या तिसऱ्या भागावर म्हणजेच ‘द फॅमिली मॅन ३’वर खिळल्या आहेत. या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच या सीझनविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘द फॅमिली मॅन ३’मध्ये अभिनेता जयदीप अहलावत हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयदीपने या सीरिजच्या आगामी सीझनमध्ये एका जुन्या पात्राचे पुनरागमन होणार असल्याचे म्हटले आहे.

‘चेल्लम सर’ पुन्हा गाजवणार सीझन!

अभिनेता जयदीप अहलावत हा त्याच्या आगामी वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन ३’मुळे प्रचंड चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नुकतीच ‘झूम’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला की, ‘हो चेल्लम सर यावेळी देखील सीरिजमध्ये दिसणार आहेत. उदय महेश हे या कथेचा एक महत्वपूर्ण भाग आहेत. त्यांची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये ‘चेल्लम सर’ या विनोदी झालर असलेल्या पात्राने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. चेल्लम सर हे असं पात्र आहे, जे कठीण काळात श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयी याला योग्य तो सल्ला देतं. या पात्राचे मीम्स देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

कधी रिलीज होणार ‘द फॅमिली मॅन ३’?

मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांची मुख्य भूमिका असणारी ‘द फॅमिली मॅन ३’ ही वेब सीरिज याच वर्षी म्हणजे २०२५च्या नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या धमाकेदार सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यासोबतच अभिनेत्री प्रियामणी, अभिनेता शरद केळकर, शारिब हाश्मी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. मात्र, आता ‘चेल्लम सर’ पुन्हा पाहायला मिळणार हे कळल्यानंतर या नव्या सीझनविषयी प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली आहे.

Web Title: The Family Man web series famous character Chellam Sir is back in third season jaideep ahlawat confirms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.