अलार्म सेट करा! उद्या किती वाजता 'द फॅमिली मॅन ३' पाहता येणार? जाणून घ्या अचूक वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:28 IST2025-11-20T15:23:54+5:302025-11-20T15:28:33+5:30

'द फॅमिली मॅन ३' उद्या ओटीटीवर नक्की किती वाजता स्ट्रीम होणार आहे.

The Family Man Season 3 Release 21 November Know Exact Streaming Time On Ott Amazon Prime | अलार्म सेट करा! उद्या किती वाजता 'द फॅमिली मॅन ३' पाहता येणार? जाणून घ्या अचूक वेळ!

अलार्म सेट करा! उद्या किती वाजता 'द फॅमिली मॅन ३' पाहता येणार? जाणून घ्या अचूक वेळ!

The Family Man 3 Ott Release  Date And Time: 'फॅमिली मॅन' (The Family Man) या सीरिजच्या पहिल्या दोन सीझन्सने संपूर्ण भारतात अक्षरशः धुमाकूळ घातला. ही सीरिज प्रेक्षकांची सर्वात लाडकी बनली. आता चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती 'द फॅमिली मॅन ३' ची. लोकप्रिय अभिनेते मनोज वाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  या तिसऱ्या सीझनची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. तर चला, जाणून घेऊया की 'द फॅमिली मॅन ३' उद्या ओटीटीवर नक्की किती वाजता स्ट्रीम होणार आहे.

कोणताही मोठा चित्रपट किंवा सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना त्याची वेळ खूप महत्त्वाची असते. कारण चाहते तासन्‌तास जागे राहून प्रीमियर होण्याची वाट पाहत असतात.  प्राइम व्हिडीओसारखे मोठे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आंतरराष्ट्रीय वेळेनुसार त्यांचे प्रोजेक्ट्स रिलीज करतात. सामान्यतः भारतात कोणताही मोठा शो रात्रीचे बरोबर १२:०० वाजता (Midnight IST) प्रदर्शित होतो. म्हणजेच जर ही सीरिज 'उद्या' प्रदर्शित होत असेल, तर तो दिवस सुरू होताच, म्हणजेच मध्यरात्री १२:०० वाजता (१२ AM IST) 'द फॅमिली मॅन ३' प्रेक्षकांसाठी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. 'द फॅमिली मॅन ३'मध्ये ७ एपिसोड असणार आहेत. प्रत्येक एपिसोड हा ५० मिनिटांचा असल्याचं बोललं जातंय.

'द फॅमिली मॅन ३'मध्ये जयदीप अहलावत आणि निम्रत कौरची एन्ट्री झालेली आहे. याशिवाय जुगल हंसराज, आदित्य श्रीवास्तव, पालिन कबाक आणि हरमन सिंघा हे कलाकारही सीरिजमध्ये दिसतील. नवीन कलाकारांसोबतच प्रेक्षकांना जुने, आवडते चेहरेही पाहायला मिळणार आहेत. 'द फॅमिली मॅन'च्या तिन्ही सीजनचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केलं आहे. जर तुम्ही आधीचे सीजन पाहिले नसतील, तर तिसरा सीझन पाहण्यापूर्वी प्राइम व्हिडीओवर तेही पाहू शकता.

Web Title : द फैमिली मैन 3: ओटीटी प्लेटफॉर्म पर रिलीज का समय हुआ खुलासा!

Web Summary : द फैमिली मैन 3 का बेसब्री से इंतजार है। प्राइम वीडियो पर भारतीय समयानुसार आधी रात को रिलीज होने की संभावना है। नए सीज़न में सात 50 मिनट के एपिसोड हैं जिनमें पुराने और नए कलाकार शामिल हैं। नया देखने से पहले पिछले सीज़न देखें।

Web Title : The Family Man 3: Release Time on OTT Platform Revealed!

Web Summary : 'The Family Man 3' is highly anticipated. Likely releasing midnight IST on Prime Video. The new season has seven 50-minute episodes featuring old and new cast members. Stream previous seasons before watching the new.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.