'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:11 IST2025-07-15T12:10:08+5:302025-07-15T12:11:43+5:30

'द फॅमली मॅन' कधी प्रदर्शित होणार, याबद्दल मनोज वाजपेयींनी सांगितले.

The Family Man Season 3 Manoj Bajpayee Confirmed Release Date Shares Big Update Main Attraction Jaideep Ahlawat | 'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट!

'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट!

The Family Man Season 3: मनोज वाजपेयी यांनी कमाल भूमिका साकारत स्वतःचा चाहतावर्ग मिळवला आहे. त्यांची लोकप्रिय 'द फॅमिली मॅन' सीरिज ही अ‍ॅक्शन, ड्रामा आणि विनोदाचं परिपूर्ण मिश्रण आहे.  या स्पाय थ्रिलरच्या दोन सीझनने ओटीटीवर धुमाकूळ घातला आणि चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'द फॅमिली मॅन ३'मध्ये  प्रेक्षकांसाठी नेमकं काय असेल मुख्य आकर्षण, याबद्दल सांगितलंय.

मनोज बाजपेयी यांनी 'द फॅमिली मॅन ३' ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याची पुष्टी केली आहे . विशेष म्हणजे या सिझनचं शूटिंग पूर्ण झालं असून पोस्ट-प्रॉडक्शनचं काम अंतिम टप्प्यात आहे. या नव्या पर्वात अभिनेता जयदीप अहलावत  (Jaideep Ahlawat) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'सीझन २' मध्ये सामंथा रूथ प्रभूने आपल्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. मनोज वाजपेयी म्हणाले, "जर समंथा सीझन २ ची स्टार होती, तर जयदीप सीझन ३ मधील विशेष आकर्षण असेल".  'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज आणि डीके यांच्याबद्दल बोलताना वाजपेयी यांनी म्हटलं की, "मला अशा कलाकारांसोबत काम करायला आवडतं जे माझ्याइतकंच कामात समर्पित असतात".

गेल्या काही दिवसांपुर्वी 'द फॅमिली मॅन ३'ची झलक समोर आली होती. श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा कर्तव्य बजावताना दिसला. तिसऱ्या सीझनमध्ये देशाच्या सीमेच्या आत आणि बाहेरून निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करत श्रीकांत नवीन वाटांवर प्रवास करणार आहे. मुख्य म्हणजे या सीझनमध्ये जयदीप अहलावतसोबत निमरत कौर हीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अजून या सीरिजची रिलीज डेट जाहीर झाली नाहीये. पण येत्या काही दिवसात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 'द फॅमिली मॅन ३' कडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

Web Title: The Family Man Season 3 Manoj Bajpayee Confirmed Release Date Shares Big Update Main Attraction Jaideep Ahlawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.