Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:35 IST2025-06-27T18:33:37+5:302025-06-27T18:35:55+5:30

मनोज वाजपेयीच्या बहुचर्चित 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा झाली असून सीरिजचा पहिला व्हिडीओ आज रिलीज झाला आहे. खलनायकाच्या भूमिकेत हा प्रसिद्ध अभिनेता आहे.

the Family Man 3 Teaser Manoj Bajpayee priyamani jaideep ahlawat nimrat kaur | Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने आज आपल्या ओरिजिनल सिरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सिझनची अधिकृत झलक प्रदर्शित केली. दिग्दर्शक जोडी राज आणि डीके यांच्या D2R Films या बॅनरअंतर्गत तयार झालेली ही सिरीज एक थरारक गुप्तहेर-कथा आहे. मनोज वाजपेयी पुन्हा एकदा या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. ‘द फॅमिली मॅन ३’मध्ये देशासाठी गुप्तचर एजंट म्हणून काम करणारा श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा कर्तव्य बजावताना दिसणार आहे. याशिवाय या सीरिजमध्ये एक प्रसिद्ध अभिनेता खलनायक साकारणार आहे. तो म्हणजे जयदीप अहलावत.

 ‘द फॅमिली मॅन ३’ची उत्सुकता शिगेला

राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिलेली आणि सुमित अरोरा यांनी संवाद लेखन केलेली ही सिरीज राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केली असून, या सिझनमध्ये सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनीही दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. देशाच्या सीमेच्या आत आणि बाहेरून निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करत श्रीकांत नवीन वाटांवर प्रवास करणार आहे. मुख्य म्हणजे या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि निमरत कौर हे कलाकार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांचा पहिला लूक बघून या सीरिजबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या सीरिजमध्ये पुन्हा एकदा मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत प्रियमणी (सुचित्रा तिवारी), शारिब हाशमी (जेके तलपडे), आश्लेशा ठाकूर (धृति तिवारी) आणि वेदांत सिना (अथर्व तिवारी) यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना पुन्हा दिसणार आहेत. अजून या सीरिजची रिलीज डेट जाहीर झाली नाहीये. पण येत्या काही दिवसात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: the Family Man 3 Teaser Manoj Bajpayee priyamani jaideep ahlawat nimrat kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.