तारीख ठरली! 'द फॅमिली मॅन सीझन ३' कधी येतोय आणि कसा आहे? मनोज वाजपेयीनं दिलं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:11 IST2025-04-01T09:08:07+5:302025-04-01T09:11:26+5:30
'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांना किती वाट पाहावी लागणार?

तारीख ठरली! 'द फॅमिली मॅन सीझन ३' कधी येतोय आणि कसा आहे? मनोज वाजपेयीनं दिलं अपडेट
The Family Man 3 Release Date: 'द फॅमिली मॅन'चा (The Family Man Season 3) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच येणार आहे. सीरिजबद्दल नवीन अपडेट आलं आहे. हे अपडेट स्वतः मनोज वाजपेयीनं दिलं आहे. या अॅक्शन-थ्रिलर ड्रामामध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे.
राज-डीके यांची ही वेब सीरिज कॉमेडी आणि स्पाय थ्रिलरचा यांचा मेळ आहे. यावेळी 'द फॅमिली मॅन ३'मध्ये 'पाताल लोक' फेम सुप्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावत पाहायला मिळणार आहे. 'ओटीटी प्ले'शी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला, "द फॅमिली मॅन सीझन ३ या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सीझनमध्ये एक नवीन सदस्य शोमध्ये सामील होत असल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. आम्ही दोन वर्षांपूर्वी जयदीप अहलावतला कास्ट केलं होतं. अलिकडेच त्यानं पाताल लोक सीझन २ मध्ये खूप चांगले काम केलं. तो 'फॅमिली मॅन सीझन ३' मध्ये आहे. हा सीझन खूप मोठा आणि खूप सुंदर आहे".
'द फॅमिली मॅन सीझन ३' निश्चित तारीख अद्याप आलेली नाही. २०१९ मध्ये 'द फॅमिली मॅन' वेब सीरिज लाँच झाली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियामणी ही मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर शारीब हाश्मी हा त्याचा सहकारी दाखवण्यात आला आहे. या सीरिजचा दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता, तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप अहलावतने कास्टला जॉईन केलं आहे. तिसऱ्या सीझनची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.