कधी रिलीज होणार 'द फॅमिली मॅन ३'? IPL सोबत आहे खास कनेक्शन, मोठी अपडेट समोर
By देवेंद्र जाधव | Updated: March 21, 2025 15:48 IST2025-03-21T15:47:37+5:302025-03-21T15:48:21+5:30
'द फॅमिली मॅन ३'च्या रिलीजविषयी मोठी माहिती समोर आली असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे (the family man 3)

कधी रिलीज होणार 'द फॅमिली मॅन ३'? IPL सोबत आहे खास कनेक्शन, मोठी अपडेट समोर
'द फॅमिली मॅन' (the family man) ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पहिल्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वाजपेयी, प्रियामणी या कलाकारांच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळवली. अशातच 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन (the family man 3) कधी येणार याविषयी सर्वांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर 'द फॅमिली मॅन ३'च्या रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या.
कधी रिलीज होणार 'द फॅमिली मॅन ३'?
'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिज दुसऱ्या सीझननंतर चार वर्षांनी रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार असं सांगण्यात येतंय की, 'द फॅमिली मॅन ३' उन्हाळी सुट्टींमध्ये प्राईम व्हिडीओवर रिलीज होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदाचा IPL चा हंगाम संपल्यावर 'द फॅमिली मॅन ३' ओटीटीवर रिलीज होईल असं सांगण्यात येतंय. जर IPL नंतर ही सीरिज रिलीज झाली नाही तर 'द फॅमिली मॅन ३' रिलीज होण्यासाठी दिवाळी २०२५ चा मुहुर्त असेल असंही सांगण्यात येतंय. याविषयी अधिकृत खुलासा मेकर्सकडून लवकरच होईल.
'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार जयदीप अहलावत
मीडिया रिपोर्टनुसार यावेळी 'द फॅमिली मॅन ३'मध्ये 'पाताल लोक' फेम सुप्रसिद्ध अभिनेता जयदीप अहलावतची एन्ट्री होणार आहे. जयदीपने 'द फॅमिली मॅन ३'चं शूटिंग नागालँडमध्ये केल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी 'द फॅमिली मॅन ३'मध्ये मनोज आणि जयदीप यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार, अशी चर्चा आहे. 'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सीझनमध्ये लोकप्रिय अभिनेत्री समांथाने खलनायकी भूमिका साकारली होती. ही भूमिका चांगलीच गाजली. आता 'द फॅमिली मॅन ३'मध्ये श्रीकांत तिवारीसमोर खलनायक म्हणून कोण दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.