आर्यन खानची "द बॅड्स ऑफ बॉलिवूड" सीरिज ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:56 IST2025-09-18T15:55:40+5:302025-09-18T15:56:07+5:30
आर्यन खानची पहिली-वहिली दिग्दर्शित वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

आर्यन खानची "द बॅड्स ऑफ बॉलिवूड" सीरिज ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल?
Aryan Khan The Bads Of Bollywood Ott Release: सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र, अभिनयात नाही, तर दिग्दर्शनात तो नशीब आजमावत आहे. आर्यनने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली पहिली वेब सीरिज "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" सध्या सर्वत्र चर्चेत आहे. काल या सीरिजचा भव्य प्रिमिअर पार पडला. त्यानंतर आज १८ सप्टेंबर रोजी ही सिरीज ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील राजकारण, संघर्ष आणि ग्लॅमरचे जग जवळून दाखवलं आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे. अनपेक्षित ट्विस्टनी भरलेल्या या सीरिजमध्ये अभिनेता लक्ष्य, बॉबी देओल, सहेर बंबा, राघव जुयाल आणि मोना सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये खास गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या आयटम साँग 'गफूर'नं तडका लावलाय. तर यासोबतच, प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या मधुर आवाजातील 'तैनू की पता' हे गाणे प्रेक्षकांना प्रेमात पाडणारं आहे.
विशेष म्हणजे या सीरिजमध्ये तब्बल ७ मोठे सेलिब्रिटी खास कॅमिओ करत आहेत. यात सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान आणि करण जोहर पाहायला मिळणार आहेत. तसेच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खुद्द शाहरुख खान या सीरिजच्या शेवटच्या भागात एका खास भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांसाठी ते एक मोठे सरप्राइज आहे. आता आर्यन खानच्या पहिल्याच दिग्दर्शन प्रयत्नाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.