रोमान्स अन् मर्डर मिस्ट्रीचा मिलाफ! ओटीटीवरील 'हा' सिनेमा पाहून डोकं चक्रावेल, शेवटपर्यंत कळणार नाही ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:08 IST2025-11-21T12:53:18+5:302025-11-21T13:08:41+5:30
२ तास १६ मिनिटांचा 'हा' थराथर सिनेमा पाहून स्क्रिनवरून नजर हटणार नाही

रोमान्स अन् मर्डर मिस्ट्रीचा मिलाफ! ओटीटीवरील 'हा' सिनेमा पाहून डोकं चक्रावेल, शेवटपर्यंत कळणार नाही ट्विस्ट
OTT Cinema: ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील चित्रपट, शोज आता घरबसल्या पाहण्याची सोय झाली आहे. आता सिनेरसिकांना त्यांच्या मोबाईलवर देश-विदेशातील कन्टेंट मोबाईलवर पाहणं शक्य झालं आहे. त्यामुळे लोकांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढली आहे. प्रेक्षकांचा हा कल पाहता अनेक निर्माते थेट चित्रपट ओटीटीवर रिलीज करत आहेत.अशाच एका चित्रपटाबद्दल सध्या बोललं जातंय. २ तास १६ मिनिटांचा हा मर्डर मिस्ट्री सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.
ओटीटीवर बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट सिनेरसिकांना ते खूप आवडतात. जबरदस्त कथा आणि एकापेक्षा एक ट्विस्ट असलेला 'हसीन दिलरुबा' हा सिनेमा सध्या ओटीटी प्रेमींमध्ये चर्चेत आहे. २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
दमदार कथेमुळे हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करू लागला होता. या चित्रपटात एका विवाहित जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. अरेंज मॅरेजनंतर दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसतं. त्याच्या नात्यात कटुता येते आणि दोघेही एकमेकांपासून दूर जातात. अभिनेत्री तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे आणि आशिष शर्मा
या कलाकरांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा इतक्या उत्तम पद्धतीने लिहिली आहे, की तुम्ही तो शेवटपर्यंत पाहाल.