Aarya 3 Teaser: एकदम कडक...! सुश्मिता सेनच्या ‘आर्या ३’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:15 IST2023-01-30T16:14:36+5:302023-01-30T16:15:17+5:30
Aarya 3 Teaser: टीझरमध्ये सुश्मिता सेनचा किलर लुक पाहायला मिळतोय. काळ्या रंगाचा ओव्हरकोट, डोळ्यांवर गॉगल, एका हातात सिगार आणि दुसऱ्या हातात बंदूक असा तिचा डॅशिंग अवतार आहे.

Aarya 3 Teaser: एकदम कडक...! सुश्मिता सेनच्या ‘आर्या ३’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
‘आर्या’ या क्रिमिनल थ्रीलर ड्रामा वेबसीरिजचे दोन्ही सीझन तुम्ही पाहिले असतीलच. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सीझनमधून सुश्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच ‘आर्या ३’चा टीझर प्रदर्शित झाला. सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आर्या ३’चा टीझर (Aarya 3 Teaser) शेअर केला आहे.
टीझरमध्ये सुश्मिता सेनचा किलर लुक पाहायला मिळतोय. काळ्या रंगाचा ओव्हरकोट, डोळ्यांवर गॉगल, एका हातात सिगार आणि दुसऱ्या हातात बंदूक असा तिचा डॅशिंग अवतार टीझरमध्ये दिसत आहे. हा टीझर शेअर करत सुश्मिताने ‘आर्या ३’चं शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा तिसरा सीझन पाहायला मिळणार आहे.
२०२१ मध्ये या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला होता. सुश्मिता आपल्या सर्व शत्रूंचा खात्मा करते आणि मुलांना घेऊन देश सोडून फरार होते, असं यात दाखवण्यात आलं होतं. आता सगळं काही ठीक आहे, असं तिला वाटत असतं. पण तिचीच चाल तिच्यावर उलटल्याचं नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. तिचा एक शत्रू अजूनही आहे, त्याचीच एन्ट्री या सीझनमध्ये दाखवली जाणार आहे.
‘आर्या’च्या पहिला सीझनला ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारा’साठी नामांकन मिळालं होतं. या सीरिजमध्ये सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत असून सिकंदर खेर वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्यासोबतच नमित दास, मनीष चौधरी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘आर्या ३’ कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण ‘आर्या ३’चा टीझर पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.