'मिसेस देशपांडे'च्या सेटवरील फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरची माधुरी दीक्षितसाठी पोस्ट, म्हणाला- "काही लोकांची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:17 IST2025-12-19T11:17:00+5:302025-12-19T11:17:23+5:30
माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे'मध्ये सिरियल किलरच्या भूमिकेत आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरीसोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही मुख्य भूमिकेत आहे. 'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थने डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे.

'मिसेस देशपांडे'च्या सेटवरील फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरची माधुरी दीक्षितसाठी पोस्ट, म्हणाला- "काही लोकांची..."
'मिसेस देशपांडे' ही नवी कोरी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या ट्रेलरनेच धमाका केला होता. 'मिसेस देशपांडे'मध्ये धक धक गर्ल माधुरी दीक्षितची वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे'मध्ये सिरियल किलरच्या भूमिकेत आहे. पहिल्यांदाच माधुरी अशी भूमिका साकारत आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरीसोबत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही मुख्य भूमिकेत आहे. 'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थने डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे.
सिद्धार्थने 'मिसेस देशपांडे'च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ जेवणाच्या टेबलावर बसल्याचं दिसत आहे. तर माधुरी त्याच्या बाजूला उभी आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थने माधुरीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "काही लोकांची स्वप्न पूर्ण होतात, तर काही लोकांची न पाहिलेली स्वप्न पण पूर्ण होतात. हे त्यातलंच एक. Mrs Deshpande आजपासून, तुमच्या हवाले!", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'मिसेस देशपांडे' ही सीरिज जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं आहे. तर वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित, सिद्धार्थ चांदेकरसह प्रियांशू चॅटर्जी, दिक्षण जुनेजा, प्रदीप वेलणकर, निमिषा नायर, कविण दवे हे कलाकार झळकले आहेत.