छत्रपती शिवरायांच्या खजिन्याची रक्षा अन्...; 'सिक्रेट ऑफ शिलेदार'चा टीझर भेटीला; कधी आणि कुठे पाहता येईल वेबसीरिज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:31 IST2024-12-27T14:30:21+5:302024-12-27T14:31:06+5:30
मराठी कलाकारांची फौज असलेली एक नवी हिंदी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर नुकताच रिलीज झालाय (sai tamhankar)

छत्रपती शिवरायांच्या खजिन्याची रक्षा अन्...; 'सिक्रेट ऑफ शिलेदार'चा टीझर भेटीला; कधी आणि कुठे पाहता येईल वेबसीरिज?
सध्या अनेक मराठी कलाकार हिंदी वेबसीरिजमध्ये अभिनय करत आहेत. अशातच आणखी एका वेबसीरिजमध्ये मराठी कलाकार भूमिका करताना दिसणार आहेत. ही वेबसीरिज म्हणजे 'द सिक्रेट ऑफ शिलेदार'. या वेबसीरिजचा टीझर नुकताच रिलीज झाला असून ऐतिहासीक कथेला काल्पनिकतेची जोड दिल्याने ही वेबसीरिज मनोरंजन करणारी असेल यात शंका नाही. सई ताम्हणकर, दिलीप प्रभावळकर या मराठी कलाकारांची वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहे.
'द सिक्रेट ऑफ शिलेदार'चा टीझर रिलीज
'द सिक्रेट ऑफ शिलेदार' वेबसीरिजच्या टीझरमध्ये दिसतं की, राजीव खंडेलवाल एका संग्रहालयासारख्या जागेत बसलेला असतो. तिथे दिलीप प्रभावळकर त्याच्यावर एक कामगिरी सोपवतात. ती म्हणजे एका खजिन्याची रक्षा करायची. हा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं सांगण्यात येतं. पुढे राजीव खंडेलवालला या कामगिरीत सई ताम्हणकर मदत करताना दिसते. अशाप्रकारे राजीव, सई या खजिन्याची रक्षा कशी करणार याची उत्कंठावर्धक झलक 'द सिक्रेट ऑफ शिलेदार'च्या टीझरमधून दिसते.
कधी आणि कुठे बघता येईल वेबसीरिज?
'द सिक्रेट ऑफ शिलेदार'मध्ये सई ताम्हणकर, राजीव खंडेलवाल, आशिष विद्यार्थी, दिलीप प्रभावळकर, नंदू माधव हे कलाकार झळकणार आहेत. डिस्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरिज प्रेक्षकांना बघता येईल. ३१ जानेवारीला या वेबसीरिजचे सर्व एपिसोड्स डिस्नी+ हॉटस्टारवर बघता येतील. विशेष गोष्ट म्हणजे बॉलिवूडमध्ये यावर्षी 'मुंज्या' सिनेमातून छाप पाडणारे मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलंय. नितिन वैद्य यांनी या वेबसीरिजची निर्मिती केलीय.