प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 09:48 AM2024-03-28T09:48:19+5:302024-03-28T09:49:14+5:30

भव्यदिव्य इव्हेंटमध्ये जाहीर केली रिलीज डेट

Sanjay Leela Bhansali heeramandi The Diamond Bazaar to screen on netflix 1 st may | प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष

प्रतिक्षा संपली! संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' ची रिलीज डेट जाहीर, 6 अभिनेत्रींनी वेधलंय लक्ष

भव्यदिव्य सेट, दर्जेदार कथानक आणि कलाकारांचे महागडे कपडे यांसाठी खासकरुन ओळखले जाणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali).  गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक त्यांच्या हीरामंडी (Heeramandi) या सीरिजची आतुरतेने वाटत पाहात आहेत. मध्यंतरी या सीरिजच्या प्रदर्शनाची रिलीज डेट लांबवणीवर पडली होती. परंतु, आता प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही संजय लीला भन्साळींची सीरिज चर्चेत आहे. मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, रिचा चड्डा, संजीदा शेख आणि शर्मिन सहगल अशी अभिनेत्रींची फौजच सीरिजमध्ये आहे. आधी पोस्टर, नंतर फर्स्ट लूक आणि त्यानंतर सीरिजचं पहिलं गाणंही आऊट झालं होतं. त्यामुळे सीरिज कधी भेटीला येते याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आता यावरुन पडदा उठला आहे. १ मे २०२४ रोजी 'हीरामंडी' वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.



काल मुंबईत आयोजित भव्य इव्हेंटमध्ये रिलीज डेट जाहीर करण्यात आली. आकाशात ड्रोनच्या साहाय्याने सीरिजचं नाव आणि रिलीज डेट झळकली. हा नजारा डोळे दिपवणारा होता. सीरिजची स्टारकास्ट यावेळी हजर होती. फक्त आदिती राव हैदरी इव्हेंटला येऊ शकली नाही. याचं खास कारण म्हणजे कालच तिने दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली.  इव्हेंटमध्ये होस्टने आदिती राव हैदरीच्या गैरहजेरीचं हे कारण उघड केलं. त्यामुळे तिने लग्न केलं यावर शिक्कामोर्तब झाला. 

Web Title: Sanjay Leela Bhansali heeramandi The Diamond Bazaar to screen on netflix 1 st may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.