Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:57 IST2024-11-08T13:56:39+5:302024-11-08T13:57:21+5:30
अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांची ही नवी स्पाय थ्रिलर वेबसीरिजगुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.

Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल
Citadel: Honey Bunny : 'सिटाडेल' या वेबसीरिजची जगभरात चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजचं स्वतःचं एक फॅन फॉलोईंग आहे. 'सिटाडेल' वेबसीरिजच्या मागील एका आवृत्तीत अभिनेत्री प्रियंका चोप्राने काम केलं होतं. आता 'सिटाडेल हनी बनी'नं अख्खं बॉलिवूड हादरवून ठेवलं आहे. अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांची ही नवी स्पाय थ्रिलर वेबसीरिजगुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.
दिग्दर्शक राज आणि डीके यांनी बनवलेल्या या सीरिजमध्ये समांथाने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावलं आहे. या वेबसीरिजची सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय. आता वरुण आणि समांथा हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. Citadel: Honey Bunny या सीरिजमधील वरुण आणि समंथा यांच्या नव्या जोडीला पसंती मिळत आहे. सीरिजमध्ये दोघांची केमिस्ट्री देखील पाहायला मिळतेय. सीरिजमध्ये वरुण- समांथा यांचा एक जबरदस्त लिपलॉक सीन आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरुण आणि समंथा यांचा लिपलॉक सीन पाहून प्रेक्षक हैराण झालेत. सोशल मीडियावर दोघांच्या लिपलॉकची चांगलीच चर्चा रंगली आहे.
एका युजरने 'एक्स'वर किसिंग सीन शेअर करताना लिहिले की, सामंथा रुथ आता हॉट अंदाजात परत आली आहे. खूप सुंदर, तिने इंटरनेटवर सर्वत्र हवा केली आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, 'सामंथा आणि वरुण यांची केमिस्ट्री दमदार आहे'. तर अजून एका युजरने लिहिले, 'वरुण-सामंथाच्या तो सीनने सर्वत्र आग लावली आहे'. तिसऱ्या युजरने लिहिले की, 'वरुण-सामंथाचा किस सीन शानदार आहे, सगळ्यांना हादरवून सोडले'. याशिवाय सर्वांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.