प्रतीक्षा संपणार! 'रानबाजार'चा पुढील भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 18:24 IST2022-06-01T18:24:13+5:302022-06-01T18:24:50+5:30

Raanbaazaar: या सीरिजचं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं असल्यामुळे त्याच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत.

raanbaazaar web series next episode coming soon | प्रतीक्षा संपणार! 'रानबाजार'चा पुढील भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

प्रतीक्षा संपणार! 'रानबाजार'चा पुढील भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'रानबाजार' (RaanBaazaar) या वेबसीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सीरिजचे १० एपिसोड रिलीज झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा पुढील भाग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सत्य घटनांच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या या सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत झळकल्या असून त्यांचा बोल्ड अंदाज लक्षवेधी ठरला. तसंच या सीरिजचं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं असल्यामुळे त्याच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत.

आतापर्यंत या सीरिजचे अनेक भाग प्रदर्शित झाले असून पुढील भाग येत्या ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  या वेबसीरिजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांच्या समावेश आहे.पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजमध्ये मोहन आगाशे हे सतीश नाईक या भूमिकेत आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारली आहे. तर मकरंद अनासपुरे या वेबसीरिजमध्ये दिवेकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दिग्दर्शक अभिजित पानसे हे पहिल्यांदा अभिनय करताना दिसत आहेत. त्यांनी इन्स्पेक्टर चारुदत्त मोकाशी ही भूमिका साकारली आहे. 

दरम्यान, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे,  वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत. अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन यांनी केली आहे.

Web Title: raanbaazaar web series next episode coming soon