'फुलवंती'नंतर कुठे गायब होती प्राजक्ता माळी?, आता 'देवखेळ' वेबसीरिजमधून भेटीला येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:53 IST2026-01-08T10:52:35+5:302026-01-08T10:53:03+5:30
प्राजक्ताने सुरु केलं वेबसीरिजचं प्रमोशन, म्हणाली...

'फुलवंती'नंतर कुठे गायब होती प्राजक्ता माळी?, आता 'देवखेळ' वेबसीरिजमधून भेटीला येणार
मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी नवीन प्रोजेक्टमधून सर्वांच्या भेटीला येणार आहे. २०२४ साली आलेल्या 'फुलवंती' सिनेमानंतर ती कुठेच दिसली नाही. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्येच सूत्रसंचालन करताना तिला पाहिलं गेलं. आता बऱ्याच काळाने प्राजक्ताला स्क्रीनवर पाहता येणार आहे. अंकुश चौधरीसोबत ती लवकरच मराठी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी प्रोजेक्टचे अपडेट दिले आहेत. अंकुश चौधरीसोबत फोटो शेअर करत तिने 'देवखेळ' या मराठी वेबसीरिजविषयी अपडेट दिलं आहे. सध्या दोघांनी सीरिजसाठी प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. प्राजक्ताने हा प्रमोशनचाच फोटो पोस्ट केला आहे. प्रमोशनसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाचा वनपीस आणि त्यावर प्रिंटेड जॅकेट घातलं आहे. या लूकमध्ये ती क्युट दिसत आहे. "...आणि 'देवखेळ'साठी प्रमोशन सुरु झालं आहे. सोबत वन अँड ओन्ली अंकुश चौधरी."

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीने याआधीही एका सिनेमा काम केलं होतं. २०२२ साली त्यांचा 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' सिनेमा आला होता. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता आणि अंकुश चौधरी चला हवा येऊ द्या'मध्ये प्रमोशनसाठी आले होते. आता त्यांना 'देवखेळ'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही वेबसीरिज झी 5 वर येणार आहे.