"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:10 IST2025-06-21T14:09:25+5:302025-06-21T14:10:17+5:30

'पंचायत' सीरिजमधून अभिनेत्री लोकप्रिय झाली. इंडस्ट्रीतील स्ट्रगलबाबतीत केली सूचक पोस्ट

panchayat series fame actress sanvikaa singh cryptic post on nepotism says wish i was an insider | "मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट

"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट

मनोरंजनविश्वात नेपोझिटमविषयी अनेकदा बोललं जातं. स्टार कलाकारांच्या मुलांना लवकर संधी मिळतात. अनेकदा त्यांच्यासाठी आऊटसायडर्सचा पत्ता कट होतो. नुकतंच एका अभिनेत्रीने यावरुन क्रिप्टिक पोस्ट केली आहे. 'आपण इनसाइडर' असतो तर बरं झालं असतं असं तिने म्हटलं आहे. अभिनेत्री गाजलेल्या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. मात्र तरी तिला संधी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि काय आहे तिची पोस्ट वाचा.

ओटीटीविश्वात सर्वात गाजत असलेली सीरिज 'पंचायत'. काही दिवसात याचा चौथा सीझन येत आहे. या सीरिजमध्ये रिंकी या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सानविकाने (Sanvikaa Singh) नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात ती लिहिते, "कधीकधी मला वाटतं मी इनसाइडर असते किंवा एखाद्या पॉवरफुल बॅकग्राऊंडमधून आले असते तर बरं झालं असतं. गोष्टी कित्येक पटींनी सोप्या झाल्या असत्या (किंवा नाही, माहित नाही). आदर आणि समानतेची वागणूक या मूलभूत गोष्टी मिळाल्या असत्या तर आयुष्यात कमी संघर्ष वाट्याला आले असते. मी वाट पाहत आहे."

सानविकाने इंडस्ट्रीत येणाऱ्या संघर्षाविषयी ही पोस्ट केल्याचं कळत आहे. संधी मिळण्यासाठी तिला आजही स्ट्रगल करावा लागत आहे. 'पंचायत'या लोकप्रिय सीरिजमध्ये सानविकाने प्रधानजींच्या मुलीचं रिंकीचं काम केलं आहे. आता येणाऱ्या चौथ्या सीझनमध्ये रिंकी आणि सचिवजींची प्रेमकहाणी आणखी फुलताना दिसणार आहे. 

सानविकाचं खरं नाव पूजा सिंह आहे. ती जबलपूरची आहे. इंजिनिअरिंग करुन ती अभिनय क्षेत्रात आली. बंगळुरुतली नोकरी सोडून ती मुंबईत आली.  आधी तिने कॉस्च्युम असिस्टंट म्हणून काम केलं. यासोबत तिने अनेक ऑडिशन दिल्या. 'पंचायत २' मध्ये तिची रिंकी ची भूमिका सविस्तर दाखवण्यात आली. तिथूनच तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. सानविकाने 'लखन लीला भार्गव' आणि 'हजामत' या सीरिजमध्येही काम केलं आहे. 'पंचायत सीझन ४' २४ जूनला रिलीज होत आहे. 

Web Title: panchayat series fame actress sanvikaa singh cryptic post on nepotism says wish i was an insider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.