धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:37 IST2025-07-15T17:37:10+5:302025-07-15T17:37:41+5:30
आसिफला रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या अभिनेता हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. हॉस्पिटलमधून अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यासोबतच त्याने हेल्थ अपडेटही दिले आहेत.
बॉलिवूड बललने दिलेल्या रिपोर्टनुसार, आसिफला रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, अजून काही दिवस त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आसिफने पोस्ट शेअर केली आहे. "गेल्या ३६ तासांपासून हे बघितल्यानंतर मला जाणवलं की आयुष्य खूप छोटं आहे. एक दिवसही आपण गृहित नाही घेतला पाहिजे. सगळं काही क्षणात बदलून जातं. जे काही तुमच्याकडे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. तुमच्यासाठी जास्त कोण महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांना जपा. आयुष्य हे एक गिफ्ट आहे आणि आपल्याला ते मिळालं आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
३४ वर्षीय आसिफला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. आसिफने मिर्झापूर, पाताल लोक यांसारख्य वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. पंचायतमधील त्याने साकारलेली दामादजी ही भूमिका गाजली होती. या वेब सीरिजमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.