Panchayat 4 Review : काहींना आवडली तर काहींना आला कंटाळा; 'पंचायत ४' प्रेक्षकांना कशी वाटली? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:44 IST2025-06-24T11:43:52+5:302025-06-24T11:44:32+5:30

Panchayat 4 Review : 'पंचायत ४' पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना कशी वाटली? जाणून घ्या

Panchayat 4 webseries twitter review jitendra kumar neena gupta raghuveer yadav | Panchayat 4 Review : काहींना आवडली तर काहींना आला कंटाळा; 'पंचायत ४' प्रेक्षकांना कशी वाटली? जाणून घ्या

Panchayat 4 Review : काहींना आवडली तर काहींना आला कंटाळा; 'पंचायत ४' प्रेक्षकांना कशी वाटली? जाणून घ्या

 'पंचायत ४' वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. ही वेबसीरिज आज रिलीज झाली आहे. पहिल्या तीन सीझनला मिळालेल्या यशानंतर चौथा सीझन पाहण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक होते. आता 'पंचायत ४' रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.  'पंचायत ४'ने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलेलं दिसतंय.  'पंचायत ४' वेबसीरिज प्रेक्षकांना कशी वाटली,  जाणून घ्या

 'पंचायत ४' पाहून प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया

एका युजरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे, "अभिनय सर्वांचा छान आहे. कथेमध्ये भावनांचं उत्तम मिश्रण आहे, लव्ह स्टोरीचा स्पर्श खूप छान आहे. काही ठिकाणी कंटाळा आला, विनोदाचा अभाव."

एका युजरने सीरिजचे कौतुक केले आणि लिहिले, 'पंचायत सीझन ४ हा फक्त एक शो नाही, तर ही सीरिज सिनेमाचं एक विद्यापीठ आहे. कथा, पटकथा आणि भावना, सर्वकाही मास्टरक्लास आहे. ही सीरिज तुम्हाला हसवते, रडवते, सीरिजमधील प्रत्येक फ्रेम काही ना काही शिकवून जाते. काही विजय आनंद देत नाहीत, काही विजय पराभवापेक्षा जास्त वेदना आणतात. हे खरे आहे, ही पंचायत आहे.'

आणखी एका युजरने लिहिले की, चौथ्या सीझनची कथा लांबवलेली आहे. मागील तीन सीझनच्या तुलनेत यावेळी शोमध्ये विनोदाची कमतरता असल्याबद्दल त्याने दुःख व्यक्त केले. तथापि, लोकांना मालिकेचा भावनिक दृष्टिकोन खूप आवडला आहे. 



याशिवाय अनेकांना  'पंचायत ४'मध्ये जो निवडणुकीचा निकाल लागतो तो  आवडला नाही. मंजु देवीला हरवून क्रांती देवी विजयी झाल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.  'पंचायत ४'मध्ये शेवटी लागलेला हा निवडणुकीचा निकाल अनेकांना दुःखी करुन गेला. मागील तीनही सीझनप्रमाणे याही सीझनचा शेवट भावनिक केल्याने अनेकांनी कौतुक केलं आहे. एकूणच  'पंचायत ४'ने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Web Title: Panchayat 4 webseries twitter review jitendra kumar neena gupta raghuveer yadav