"मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

By देवेंद्र जाधव | Updated: June 25, 2025 17:04 IST2025-06-25T17:01:23+5:302025-06-25T17:04:00+5:30

पंचायत वेबसीरिजमधील रिंकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिंकीच्या साधेपणाने सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत

panchayat 4 fame rinki actress sanvika video viral fans praised her simplicity | "मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

"मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

नुकतीच 'पंंचायत ४' वेबसीरिज रिलीज झाली आहे. या वेबसीरिजची आधीपासून चर्चा होती. अशातच 'पंंचायत ४' वेबसीरिज रिलीज होताच प्रेक्षकांनी ही वेबसीरिज पाहून त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. 'पंंचायत' वेबसीरिजमधील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. अशातच 'पंंचायत'मधील प्रधानजींची लाडकी रिंकी अर्थात अभिनेत्री सान्विकाची चर्चा असते. सान्विकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हा फोटो काढायला उभ्या असलेल्या सान्विकाच्या नम्र आणि साध्या स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय.

सान्विकाच्या व्हिडीओने जिंकलं मन

सान्विकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पापाराझी तिचं फोटोशूट करण्यासाठी बाहेर थांबलेले असतात. सान्विका बाहेर येते. ती सर्वांना पाहून आश्चर्यचकित होते. पापाराझी सान्विकाला लेफ्ट, राईटकडे बघून पोझ द्यायला सांगत होते. सान्विका सुद्धा त्यांच्या म्हणण्याला मान देऊन फोटोशूट करत होती. "मी पहिल्यांदाच असं काहीतरी करतेय. मला थोडी लाज वाटतेय.", असं सान्विकाने नम्रपणे पापाराझींना सांगितलं. त्यामुळे अभिनेत्रीच्या साधेपणाने तिच्या चाहत्यांचं मन जिंकलंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.


सान्विकाबद्दल सांगायचं तर, 'पंचायत'च्या पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला सान्विका दिसली. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि नुकताच रिलीज झालेल्या चौथ्या सीझनमध्ये सान्विकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. सान्विका रिअल लाईफमध्येही रिंकीसारखी साधीच असल्याचं पाहायला मिळतंं. स्वभावातला नम्रपणा, समोरच्याचं ऐकण्याचा संयम, हळूवार बोलणं अशा गोष्टींमुळे सान्विकाने खऱ्या आयुष्यातही लोकांचं प्रेम मिळवलं आहे. 

 

Web Title: panchayat 4 fame rinki actress sanvika video viral fans praised her simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.