ऑनस्क्रीन टक्कर, तर खऱ्या आयुष्यात कसं आहे नीना गुप्ता-सुनीता राजवार यांचं नातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:20 IST2025-06-19T17:19:47+5:302025-06-19T17:20:27+5:30

दोघींचीही जुनी ओळख आहे. एकमेकींबद्दल म्हणाल्या...

neena gupta and sunita rajwar actresses seen in panchayat praises each others work | ऑनस्क्रीन टक्कर, तर खऱ्या आयुष्यात कसं आहे नीना गुप्ता-सुनीता राजवार यांचं नातं?

ऑनस्क्रीन टक्कर, तर खऱ्या आयुष्यात कसं आहे नीना गुप्ता-सुनीता राजवार यांचं नातं?

ओटीटीविश्वात अनेक लोकप्रिय वेबसीरिज आहेत. त्यातच एक म्हणजे 'पंचायत'. लवकरच या सीरिजचा चौथा सीझन येतोय. फुलेरा गावाची अगदी साधी, हलकी फुलकी कहाणी सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. नव्या सीझनमध्ये पंचायतच्या निवडणूका आहेत. गावाचा प्रधान कोण होणार यासाठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. सध्याच्या प्रधान मंजू देवी म्हणजेच नीना गुप्ता आणि बनराकसची बायको क्रांती देवी यांच्यात टक्कर असणार आहे. या दोघींचं ऑफस्क्रीन नातं नेमकं कसं आहे माहितीये का?

नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी सीरिजमध्ये मंजू देवीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सुनीता राजवार (Sunita Rajwar) या क्रांती देवीच्या भूमिकेत आहेत. दोघीही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत उत्तमोत्तम काम करत आहेत. तसंच दोघींची ओळख ही थिएटरच्या दिवसांपासून आहे. पीटीआयशी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, "आम्ही थिएटर करतानाच भेटलो होतो. आम्ही एकत्र नाटकही केले आहे. नंतरही आम्ही सोबत काम करत होतो. अनेक वर्षांपासून आमची मैत्री आहे. कधीकधी आम्ही लंच किवा डिनरसाठीही भेटतो. पंचायत सीरिजमध्ये सुनीता असणार आहे हे जेव्हा मला कळालं होतं तेव्हा मी खूप खूश झाले होते. ती संध्याकाळी माझ्या खोलीत आली. आम्ही एकत्रच जेवलो. बऱ्याचदा तिने माझ्यासाठी घरुन जेवणं आणलं. मला खूप चांगली मैत्रीण मिळाली."

सुनीताच्या स्तुती करताना त्या म्हणाल्या, "जेव्हा कोणी व्यक्ती हा मनातून चांगला असतो तेव्हा त्याचा चांगुलपणा हा त्याच्या कामातूनही झळकतो. सुनीता इतरांची खूप मदतही करते. तसंच ती तिच्या भूमिकेत अक्षरश: स्वत:ला झोकून देते. मला तिचं काम कायमच आवडतं."

तर सुनीता यांनीही नीना गुप्तांची स्तुती केली. म्हणाल्या, "नीना उत्तम अभिनेत्री आहे. 'वो छोरी' मध्ये तिने उत्कृष्ट काम केलं. यासाठी तिला नॅशनल अवॉर्डही मिळाला. ती ज्याप्रकारे इतरांसमोर स्वत:ला प्रेझेंट करते ते खरंच वाखणण्याजोगं आहे. ती मनाने खूप चांगली आहे. पंचायत शिवायही आम्ही एकमेकींसोबत बरंच काम केलं आहे.

Web Title: neena gupta and sunita rajwar actresses seen in panchayat praises each others work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.