रोमॅन्टिक, अॅक्शन चित्रपट पडले मागे; ओटीटीवर भाव खाऊन गेली 'ही' साधारण गावाकडची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:12 IST2025-11-03T18:08:05+5:302025-11-03T18:12:13+5:30
ना रोमान्स, ना अॅक्शन! ओटीटीवर भाव खाऊन गेली साधारण गावाकडची कहाणी! मिळतेय सर्वाधिक पसंती

रोमॅन्टिक, अॅक्शन चित्रपट पडले मागे; ओटीटीवर भाव खाऊन गेली 'ही' साधारण गावाकडची कहाणी
Panchayat Webseries: आजकाळच्या डिजीटल युगात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सीरिज पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दर आठवड्याला ओटीटीवर नव-नवीन कथांवर आधारित चित्रपट किंवा सीरिज प्रदर्शित केल्या जातात. मात्र, त्यातील काहींनाच यश मिळतं. पण, अशी एक सीरिजची सध्या ओटीटीवर चर्चा आहे. या सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. कोणताही बोल्ड कंटेट नाही, एका साध्या गावातली कथा सांगणारी ही वेब सीरिज प्रेक्षकांना भावली. यातल्या पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कोणती आहे ही सीरीज? चला तर मग जाणून घेऊया...
सध्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या सीरिजचं नाव 'पंचायत' आहे. 'पंचायत' चा पहिला भाग २०२० साली प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत या सीरीजचे ४ भाग आले जे प्रचंड गाजले. फुलेरा गाव तसेच तेथील प्रत्येक गोष्टींचं अचूक चित्रण करणाऱ्या तसंच वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करणाऱ्या या वेब सीरिजला लोकांनी खूप पसंत केलं.
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुवीर यादव स्टारर पंचायत त्याच्या पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित आणि चंदन कुमार लिखित, ही सीरिज भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मच्या इतिहासात एक प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे आता या सीरीजचा पाचवा भाग कधी येणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. सध्या ही बहुचर्चित वेब सीरिज अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.