मिर्झापूर ४ कधी करणार 'भौकाल'? मोठं अपडेट आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:32 IST2025-06-12T11:30:51+5:302025-06-12T11:32:06+5:30

बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर' वेब सीरिजचा सीझन ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mirzapur Season 4 To Release In July 2025? Shweta Tripathi Drops A Major Hint | मिर्झापूर ४ कधी करणार 'भौकाल'? मोठं अपडेट आलं समोर

मिर्झापूर ४ कधी करणार 'भौकाल'? मोठं अपडेट आलं समोर

Mirzapur Season 4: सध्या सिनेमांसोबतच वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घरबसल्या आरामात आपल्याला हवी ती आणि हवं तेव्हा सिरीज पाहण्यास लोक हल्ली प्राधान्य देतात. भारताच्या सर्वात लोकप्रिय क्राईम थ्रिलर सिरीजपैकी एक असलेली मिर्झापूर ही सर्वाधिक पाहिली गेलेली वेब सिरीज प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आतापर्यंत या सिरीजचे तीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता 'मिर्झापूर'च्या चौथ्या सिझनची उत्सुकता आहे. 'गोलू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने अलीकडेच 'मिर्झापूर ४' आणि 'मिर्झापूर: द फिल्म'बाबत महत्त्वाचं अपडेट दिलं आहे.

श्वेता त्रिपाठीने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "काम वेगात सुरू आहे. मी सेटवर परत जाण्यास खूप उत्सुक आहे. ही माझ्या आवडत्या भूमिका आणि सेटपैकी एक आहे. जेव्हा लोक मला 'गोलू दीदी' म्हणतात, तेव्हा खूप छान वाटतं".

ती पुढे म्हणाली की, "माझा वाढदिवस जुलैमध्ये आहे आणि मागच्यावेळी तिसरा सीझनही त्याच काळात प्रदर्शित झाला होता. यंदाही जुलैमध्ये काहीतरी विशेष घडू शकतं. फिंगर्स क्रॉस्ड". तिच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, 'मिर्झापूर’च्या चौथ्या सीझनबाबत मोठं अपडेट जुलैमध्ये मिळू शकतं. शिवाय, 'मिर्झापूर: द फिल्म'सुद्धा प्रेक्षकांसाठी आणखी एक सरप्राइज ठरू शकते.

'मिर्झापूर' या सिरीजचा पहिला सीझन २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, विक्रांत मेसी, रसिका दुग्गल, श्रिया पिळगावकर आणि श्वेता त्रिपाठी यांसारख्या दमदार कलाकारांनी काम केलं आहे. क्राईम, सस्पेन्स आणि राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सिरीज अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होते. या सिरीजचं दिग्दर्शन आदित्य मोहंती, करण अंशुमन, मिहिर देसाई आणि आनंद अय्यर यांनी केलं आहे. तर निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे.

Web Title: Mirzapur Season 4 To Release In July 2025? Shweta Tripathi Drops A Major Hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.