काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:17 IST2025-08-23T12:15:56+5:302025-08-23T12:17:26+5:30

२०१९ साली काजोलची 'द ट्रायल'सीरिज आली होती. आता ६ वर्षांनी सीरिजचा दुसरा पार्ट येत आहे.

kajol starrer the trial season 2 trailer released rajeev sen gupta sonali kulkarni also in lead roles | काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका

काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका

अभिनेत्री काजोलची (Kajol) वेबसीरिज 'द ट्रायल' (The Trial 2) चा दुसरा सीझन येणार आहे. पहिल्या सीझन चांगलाच गाजला होता. काजोलला नायोनिका सेनगुप्ता या वकीलाच्या भूमिकेत प्रेक्षकांची पसंती मिळाली. पतीने विश्वासघात केल्यानंतरही नायोनिका तिचं कर्तव्य पार पाडते मात्र तिचं पतीसोबतचं नातं बिघडतं. त्यात ती केसही लढते. अशी सीरिजची कथाही प्रेक्षकांना आवडली. आता सीझन २ चा ट्रेलर काल रिलीज झाला आहे. 

२०१९ साली काजोलची 'द ट्रायल'सीरिज आली होती. आता ६ वर्षांनी सीरिजचा दुसरा पार्ट येत आहे. काल याचा ट्रेलर रिलीज झाला. या नव्या सीझनची गोष्टी आणखी रोमांचक असणार आहे. नायोनिका (काजोल) आणि पती जिशु (राजीव सेनगुप्ता) यांच्यातील नातं सावरणार का, भ्रष्टाचार आणि सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या जिशुला अटक होणार का याची उत्तरं दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळणार आहेत. तसंच पहिल्या सीझनच्या शेवटी जिशु राजकारणात पाऊल ठेवत असल्याचं दिसून आलं होतं ज्याला नायोनिकाने विरोध केला होता. तर आता दुसऱ्या सीझनमध्ये नायोनिका पतीकडून घटस्फोट मागते. नायोनिका यावेळीही कर्तव्य निवडणार की स्वत:ला प्राधान्य देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे यावेळी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही (Sonali Kulkarni) सीरिजचा भाग आहे. ती राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहे. काजोल विरुद्ध सोनाली असा एकंदर सीन बघायला मिळणार आहे.


'काजोल वेबसीरिजचा जमानाही गाजवत आहे, ती इथे राज्य करायला आली आहे',  'काजोल कधीच निराश करत नाही', 'नायोनिका इ बॅक' अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी काजोलचं कौतुक केलं आहे. 

ट्रेलरमध्ये काजोलचा पहिल्यासारखाच दमदार अवतार दिसणार आहे. एक पॉवरफुल आई, डॅशिंग वकील अशी तिची छबी आहे. 'जब बच्चो पर आंच आती है तो एक मां अपने बच्चो के लिए कुछ भी कर सकती है, अब आपकी लढाई एक मां के साथ है' हा काजोलचा डायलॉग तिच्या दमदार भूमिकेचं दर्शन घडवत आहे. प्रेक्षकांना ट्रेलर खूपच आवडला असून आता सर्वच रिलीजची वाट पाहत आहेत. १९ सप्टेंबर रोजी 'द ट्रायल २' जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: kajol starrer the trial season 2 trailer released rajeev sen gupta sonali kulkarni also in lead roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.