सस्पेन्स अखेर संपला!! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार 'पंचायत 3'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 15:18 IST2024-05-02T15:17:06+5:302024-05-02T15:18:47+5:30

'पंचायत 3'ची रिलीज डेट समोर आली आहे.

Jitendra Kumar-led Panchayat Season 3 is set to premiere on May 28, 2024 on Prime Video | सस्पेन्स अखेर संपला!! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार 'पंचायत 3'

सस्पेन्स अखेर संपला!! 'या' दिवशी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार 'पंचायत 3'

ओटीटीवर सर्वाधिक पाहिली गेलेली वेब सीरिज अर्थात 'पंचायत 3'.   'पंचायत' च्या आधीच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. गेली अनेक दिवस या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. पंचायत 3 कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष असताना अखेर निर्मात्यांनी 'पंचायत 3'ची रिलीज डेट सांगून टाकली आहे.

ॲमेझॉन प्राईमनं 'पंचायत 3' रीलिज डेटचा खुलासा केला आहे. येत्या येत्या 28 मे रोजी पंचायच 3 'पंचायत 3'वर प्रदर्शित होणार आहे. "तुम्ही सर्व दुधी भोपळे हटवले. आता आम्ही तुमचं बक्षीस अनलॉक करतोय! पंचायत सीझन 3 प्राइम वर 28 मे पासून', अशी हटके पोस्ट लिहित निर्मात्यांनी रिलीज डेट जाहीर केली आहे.

भारतातील बहुप्रतिक्षित वेबसिरीजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ओटीटीवरील 'पंचायत' (Panchayat 3) या वेबसीरिजची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 'पंचायत 3' च्या माध्यमातून पुन्हा एकदा सचिव, प्रधान, भूषण, विकास आणि बनराकस अर्थात भूषण प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.

Web Title: Jitendra Kumar-led Panchayat Season 3 is set to premiere on May 28, 2024 on Prime Video